AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या दोन स्टेशन दरम्यान चोरट्यांचा थांबा, तीन महिन्यात साडेतीनशे मोबाईल चोरले, पोलिस म्हणतात…

kalyan Crime News : कल्याण ते आंबिवली दरम्यान दरवाजामध्ये उभे राहून मोबाईलवर बोलत असलेल्या प्रवाशाच्या हातावर फटका मारून मोबाईल चोरी करण्याच्या घटनेत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तीन महिन्यात साडेतीनशे मोबाईल गेले चोरीच्या घटना घडल्या आहेत.

या दोन स्टेशन दरम्यान चोरट्यांचा थांबा, तीन महिन्यात साडेतीनशे मोबाईल चोरले,  पोलिस म्हणतात...
मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीवर अत्याचार
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: May 20, 2023 | 8:14 AM
Share

सुनील जाधव, कल्याण : कल्याण लोहमार्ग पोलीस (Kalyan railway police) ठाण्याच्या हद्दीमधील कल्याण ते आंबिवली (Kalyan to Ambivali) हा पट्टा अधिक संवेदनशील झाला आहे. कारण मोबाईल चोरीला जाणे आणि सोनसाखळी खेचून नेण्याच्या घटनांमुळे रेल्वे प्रवासी हैराण झाले आहेत. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या तीन महिन्यात साडे तीनशे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी 40 टक्के तक्रारीचे निवारण करण्यात रेल्वे पोलीसांना यश आलं आहे. प्रवाशांनी दरवाजामध्ये उभं राहून प्रवास करू नये, गर्दीत प्रवास करताना आपला मोबाईल (mobile) आणि बॅगची काळजी घ्यावी असं आवाहन कल्याण लोहमार्ग पोलिसांनी केलं आहे.

सात गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीसांना यश

अनेकदा मोबाईल चोरीला गेला, तरी प्रवासी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देणे टाळतात.त्यामुळे मोबाईल चोरीचा आकडा प्रत्यक्षात अधिक असण्याची शक्यता आहे. प्रवासी अनेकदा लोकलच्या दरवाजामध्ये उभे राहून मोबाईलवर बोलत असतात. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या हातावर फटका मारून मोबाईल चोरत आहेत. कल्याण ते आंबिवली दरम्यान अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. इराणी गँगच्या सोबत असणारे इतर आरोपी अशा प्रकारची कृत्य करत मोबाईल चोरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. नुकतेच कल्याण लोहमार्ग पोलिसांनी मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांचा तपास करताना तीन मुख्य आरोपींना अटक केली आहे. यापैकी दोन आरोपी हे अल्पवयीन असून त्यांच्याकडून एकूण सात गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीसांना यश आलं आहे. प्रवाशांनी दरवाजामध्ये उभं राहून प्रवास करू नये त्याचप्रमाणे गर्दीत प्रवास करताना आपला मोबाईल आणि बॅगची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबईतल्या अनेक स्टेशनच्यामध्ये बाहेर उभे राहणाऱ्या प्रवाशांच्या मोबाईलवरती फटका मारला जातो. मोबाईल खाली पडला की, चोरटे तो ताब्यात घेऊन पुढील गोष्टी करतात. कुर्ला आणि सायन स्टेशनच्यामध्ये सुध्दा अशा पद्धतीचा प्रकार अनेकदा घडला आहे.

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश