AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deool Band 2: अखेर ‘देऊळ बंद 2’ने उमटवली 100 कोटी रुपयांवर मोहोर; प्रवीण तरडेंची मोठी घोषणा

Deool Band 2: 'देऊळ बंद 2' या चित्रपटाने अखेर कमाईचा 100 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. प्रवीण तरडे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. प्रदर्शनाच्या 39 दिवसांत या चित्रपटाने हा टप्पा गाठला आहे.

Deool Band 2: अखेर 'देऊळ बंद 2'ने उमटवली 100 कोटी रुपयांवर मोहोर; प्रवीण तरडेंची मोठी घोषणा
देऊळ बंद 2, प्रवीण तरडेImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 30, 2026 | 9:48 AM
Share

प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम रचला आहे. या चित्रपटाने अवघ्या 39 दिवसांत कमाईचा 100 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली आहे. त्याचसोबत त्यांनी मोठी घोषणासुद्धा केली आहे. 21 मे 2026 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून आजपर्यंत थिएटरमध्ये प्रेक्षक गर्दी करत आहेत. 39 व्या दिवसाचा शेवटचा शोसुद्धा जवळपास हाऊसफुल होता. पहिल्या रांगेपासून शेवटच्या रांगेपर्यंत सर्व खुर्च्या बुक झाल्या होत्या. अवघ्या आठ ते दहा कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटानंतर आता ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपटसुद्धा 100 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये समाविष्ट झाला आहे.

इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत प्रवीण तरडे म्हणाले, “39 व्या दिवसाचा आज शेवटचा शो.. हाच तो प्रेक्षक ज्याने शंभर कोटींवर शेवटची मोहोर उमटवली आहे. आजपासूनच मराठवाडा, खान्देश इथून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या 200 मुलींना दोन्ही वेळचा मेसचा डबा मोफत दिला जाणार आहे. चित्रपटातून मिळणारा नफा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलींच्या शिक्षणासाठी वापरण्याची मूळ संकल्पना जयश्री वाणी आणि जुईली वाणी यांची होती. या निधीतून त्या मुलींच्या शिक्षणाचा, दोन वेळच्या जेवणाचा आणि वाचनालयाच्या सुविधेसाठीचा खर्च उचलला जाणार आहे.” प्रवीण तरडे यांच्या या कार्याचं नेटकऱ्यांकडून विशेष कौतुक होत आहे.

प्रवीण तरडे यांचा व्हिडीओ-

शेतकऱ्यांची होणारी फसवणूक, त्यांना मिळणारं सुमार दर्जाचं बी-बियाणं, बनावट खतं, कीटकनाशकं, सरकारी अधिकाऱ्यांकडून होणारा छळ या सगळ्या वास्तवाची मांडणी ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटात करण्यात आली आहे. यामध्ये प्रवीण तरडेंची पत्नी आणि अभिनेत्री स्नेहल तरडेनं महिला शेतकरीची मुख्य भूमिका साकारली आहे. तिचा नवरा, सासू हे स्वामीभक्त असतात, ती मात्र नास्तिक आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी खूप कष्ट करायची तिची तयारी आहे. तर दिग्गज अभिनेते मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या भूमिकेत आहेत.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान अन् राज ठाकरे तर थेट...