AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑनलाईन नोकरीचे आमिष दाखवत महिलेची लाखोंची लूट, काय आहे मोडस ऑपरेंडी?

एक महिला ऑनलाईन नोकरी शोधत होती. तिने इंटरनेटवर जॉब सर्च केला. दुसऱ्या दिवशी महिलेला एका कंपनीकडून ऑफर आली. महिलेने ती ऑफर स्वीकारली. पण नंतर पश्चातापाची वेळ आली.

ऑनलाईन नोकरीचे आमिष दाखवत महिलेची लाखोंची लूट, काय आहे मोडस ऑपरेंडी?
जॉब ऑफरImage Credit source: Google
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: May 12, 2023 | 3:18 PM
Share

मुंबई : ऑनलाईन नोकरी देण्याच्या बहाण्याने महिलेला 10 लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना मुंबईतील वांद्रे परिसरात उघडकीस आली आहे. राजश्री संखे असे फसवणूक झालेल्या 48 वर्षीय महिलेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. महिलेला हॉटेलचे पॉझिटिव्ह रिव्ह्यू लिहून पैसे कमविण्याचे काम देण्यात आले होते. यानंतर महिलेला मोठ्या टास्कमध्ये पैसे गुंतवण्यास सांगण्यात आले. त्यानुसार महिलेने पैसे गुंतवले.

इंटरनेटवर जॉब सर्च करत होती महिला

वांद्रे येथे राहणाऱ्या राजश्री संखे या नवीन नोकरीसाठी इंटरनेट ब्राउझ करत होती. दुसर्‍या दिवशी, त्यांना अमोली नामक महिलेचा मॅसेज आला. अमोलीने स्वतःची टार्गेट-जी कंपनीची एचआर म्हणून ओळख सांगितली. अमोलीने तक्रारदाराला त्वरीत पैसे मिळवण्याची ऑफर संखे यांनी दिली. हॉटेलचा ऑनलाईन रिव्ह्यू करण्यासाठी 150 रुपये ऑफर केले. तिने सुरुवातीला केलेल्या कामाचा मोबदला देण्यात आला.

टास्क पूर्ण करण्यासाठी 10 लाख रुपये जमा करण्यास सांगितले

संखे हे काम पूर्ण करत राहिल्याने त्यांना दिलेल्या आयडीमध्ये पैसे जमा होत राहिले. त्यांनी कर्ज घेतले आणि टास्क मिळवण्यासाठी 9.95 लाख रुपये भरले. मात्र, रक्कम जमा केल्यानंतर त्यांना कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे संखे यांच्या लक्षात आले. यानंतर संखे यांनी याप्रकरणी वांद्रे पोलिसात धाव घेत तक्रार दिली. संखे यांच्या तक्रारीनुसार वांद्रे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?