सुसाईड नोटमध्ये घराचा आणि १४ लाख रुपयांचा उल्लेख, टॅक्स वाचवण्यासाठी डॉक्टरचा जुगाड

| Updated on: May 27, 2023 | 8:05 AM

काल हा प्रकार घडल्यापासून साताऱ्यामध्ये सगळीकडे या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर त्या तरुणाने आत्महत्या करण्यापुर्वी जे काही लिहीलं आहे, त्याची देखील सगळीकडं चर्चा सुरु आहे. युवकाचे नातेवाईक अधिक संतप्त झाले आहेत.

सुसाईड नोटमध्ये घराचा आणि १४ लाख रुपयांचा उल्लेख, टॅक्स वाचवण्यासाठी डॉक्टरचा जुगाड
satara Doctor
Image Credit source: tv9marathi
Follow us on

दिनकर थोरात, सातारा : डॉक्टरांच्या (satara Doctor) मारहाणीला कंटाळून आत्महत्या केलेल्या युवकाचा मृतदेह नातेवाइकांनी कोरेगाव पोलीस ठाण्यासमोर ठेवून डॉक्टरांना अटक करण्याची मागणी केली आहे. शशीकांत बोतालजी असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. डॉक्टरने युवकाकडून 14 लाखांची रक्कम आणि घराची जबरदस्ती नोटरी करुन घेतल्याची युवकाच्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख आहे. कोरेगाव पोलीस (koregaon) स्टेशन बाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चिठ्ठीत नावे असलेल्या डॉक्टरांना अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी (satara crime news) केली आहे. या प्रकरणामुळे डॉक्टरांचा सगळा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.

डॉक्टरांनी टॅक्स वाचवण्यासाठी…

शशिकांत हा हॉस्पिटलमध्ये काम करत असताना त्याच्या खात्यावर डॉक्टरांनी टॅक्स वाचवण्यासाठी 6 लाख 10 हजारांचे ट्रांजेक्शन केलं. घराची जबरदस्ती नोटरी करून घेत डॉक्टरांनी घरं नावावर करून घेतले. हे करत असताना डॉक्टरांनी युवकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीला आणि दबावला कंठाळून युवकाने चिट्ठी लिहून ठेवत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित डॉक्टर सुहास चव्हाण, डॉ गणेश होळ आणि गोपाळ साळुंखे यांना अटक झाल्याशिवाय युवकाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेत मृतदेह कोरेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवला असल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा

आत्महत्या करण्यापुर्वी जे काही लिहीलं

काल हा प्रकार घडल्यापासून साताऱ्यामध्ये सगळीकडे या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर त्या तरुणाने आत्महत्या करण्यापुर्वी जे काही लिहीलं आहे, त्याची देखील सगळीकडं चर्चा सुरु आहे. युवकाचे नातेवाईक अधिक संतप्त झाले आहेत. डॉक्टरांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे.