घडलंय बिघडलंय…एका तरुणीचे 6 बॉयफ्रेंड…एकाचवेळी सर्व एकसाथ हॉटेलात पोहोचले, त्यानंतर जे झालं…?

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सहा बॉयफ्रेंडपैकी कोणालाही इतरांच्याबद्दल काहीही माहिती नव्हती. पण एका मुलाला संशय येताच त्याने सत्य जाणून घेण्याचा निर्णय घेतला आणि जे घडले ते भयानक

घडलंय बिघडलंय...एका तरुणीचे 6 बॉयफ्रेंड...एकाचवेळी सर्व एकसाथ हॉटेलात पोहोचले, त्यानंतर जे झालं...?
| Updated on: Jul 08, 2025 | 8:52 PM

प्रेमातील बेवफाईचे अनेक किस्से तुम्ही ऐकले किंवा पाहीले असतील. परंतू एका तरुणीने एकाच वेळी सहा बॉयफ्रेंड बाळगल्याचे एक मासलेवाईक प्रकरण उघडकील आले आहे. आणि या कानाची त्या कानाला खबर नव्हती. परंतू या मुलीच्या एका चाणाक्ष प्रियकरांना काहीतरी पाणी मुरतंय याचा संशय आलाच. त्याने आपल्या गर्लफ्रेंडची हेरगिरी सुरु केली आणि त्यानंतर ते घडले ते धक्कादायक होते.

हे प्रकरण बांग्लादेशची राजधानी ढाका येथील एका छोट्या विभागातील आहे. येथे एका मुस्लीम मुलीने एका वेळी सहा बॉयफ्रेंडना झुलवत ठेवले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सहा पैकी कोणाही ही गोष्ट कळली नव्हती. सर्वांना वाटत होते की ही मुलगी आपल्यावरच लट्टू झालेली आहे. परंतू एका मुलाला अखेर या मुलीचा संशय झालाच.तेव्हा त्याला देखील धक्का बसला. त्याने मग या मुलीवर पाळत ठेवायला सुरुवातच केली. या मुलीलाही त्याचा काही संशय आला नाही. त्यानंतर तिला कोणाचे फोन येतात हे ऐकायला सुरुवात केली. त्यानंतर त्याचा संशय खराच असल्याचे त्याला हळूहळू समजत गेले. परंतू या मुलीच्या बेवफाईचा पर्दाफाश करायचाच असे त्याने ठरवले.

या मुलीला सहा बॉयफ्रेंड असूनही त्यातील एकाही मुलीला अनेक महिने या गोष्टीचा थांगपत्ता नव्हता. त्यानंतर एका मुलाला संशय आला. तेव्हा त्याने एक योजना आखली. त्याने या मुलीला येणारे कॉल कोणाचे आहेत याचा माग काढायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने गुपचुप येणारे कॉल आणि मॅसेज पाहायला सुरुवात केली. त्याने सोशल मीडियाचा वापर या मुलीची पाळत ठेवण्यासाठी केला. त्यानंतर त्याला काही संदिग्ध मॅसेजही सापडले. जे त्यांच्या प्रेयसीने इतर बॉयफ्रेंडना पाठवले होते. त्यानंतर त्याने तिच्या बॉयफ्रेंडचा शोध घेतला आणि त्यांच्याशी संपर्क करायला सुरुवात केली. तेव्हा त्या मुलांनी देखील कबूल केले की ते त्याच मुलीच्या प्रेमात आहेत.

अशी केली पोलखोल

या मुलीच्या प्रियकराने या मुलीचा ड्राम्याचा सर्वांसमोर भांडाफोड करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने त्या मुलीला एका हॉटेलमध्ये बोलावले. त्याचवेळी त्या सर्व पाच मुलांनाही त्याच हॉटेलमध्ये बोलावले. जेव्हा हे सर्वजण एकत्र आले तेव्हा या मुलीचा चेहरा बघण्यासारखा झाला. या सीन एखाद्या चित्रपटाला लाजवले असा झाला होता.