Abhishek Gosalkar Murder | अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मोठे अपडेट, मॉरिसच्या गार्डला जामीन मिळाला तर…

| Updated on: Mar 13, 2024 | 8:46 AM

शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवकावर अभिषेक घोसाळकर यांची गेल्या महिन्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दहीसरमधील मॉरिसभाईच्या कार्यालयात अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस भाई सोबतच फेसबुक लाईव्ह करत होते. त्यानंतर अचानक मॉरिस भाई याने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकरणात नवे अपडेट समोर आले आहेत.

Abhishek Gosalkar Murder | अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मोठे अपडेट, मॉरिसच्या गार्डला जामीन मिळाला तर...
Follow us on

मुंबई | 13 मार्च 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवकावर अभिषेक घोसाळकर यांची गेल्या महिन्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दहीसरमधील मॉरिसभाईच्या कार्यालयात अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस भाई सोबतच फेसबुक लाईव्ह करत होते. त्यानंतर अचानक मॉरिस भाई याने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या. आणि त्याने स्वत:वर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली. महिन्याभरापूर्वी घडलेल्या या हत्याकांडामुळे प्रचंड खळबळ माजली होती.

आता या प्रकरणात नवे अपडेट समोर आले आहेत. मॉरिसने जी पिस्तुल वापरून अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या ती पिस्तुल त्याची नव्हे तर त्याच्या बॉडीगार्डची अमरेंद्र मिश्रा याची होती. त्यामुळे या हत्याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी त्यालाही अटक केली होती. मिश्रा याने जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र आरोपी मॉरीसच्या या बॉडीगार्डला जामीन दिल्यास साक्षीदारांना धोका पोहोचू शकतो, असे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवत त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

8 फेब्रुवारी रोजी फेसबुक लाइव्ह सत्रादरम्यान सेनेचे (UBT) नेते अभिषेक घोसाळकर यांना गोळ्या घालून ठार मारणारा मॉरिस याला, त्याचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा याने वापरलेली बंदूक दिली होती. या गुन्ह्यात मिश्राच्या भूमिकेबद्दलचे आरोप वाजवी आहेत, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने मिश्रा याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. आरोपी मिश्राला या टप्प्यावर जामिनावर सोडले तर साक्षीदारांना धोका होऊ शकतो, असेही न्यायाधीशांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

घोसाळकर यांच्या हत्येनंतर दुसऱ्याच दिवशी मिश्राला अटक करण्यात आली होती. हत्येसाठी वापरण्यात आलेली बंदूक ही मिश्रा (44) यांची होती. ती मॉरिस याच्या सांगण्यावरून त्याने त्याच्या ऑफीसच्या लॉकरमध्ये ठेवली होती. आणि त्याची किल्ली अंगरक्षक मिश्रा यांनी त्यांच्याकडे ठेवली होती. मात्र त्या दिवशी लॉकर फोडल्याचे दाखवण्यासारखे काहीही नव्हते, असे न्यायाधीशांनी सांगितले. म्हणूनच, वस्तुस्थिती प्रथमदर्शनी असं दिसतं की बंदुकीचा ॲक्सेस अर्जदाराने प्रदान केला होता.
फिर्यादीच्या युक्तिवादात तथ्य आहे की बंदूक अर्जदाराने मॉरिस नोरोन्हा यांना दिली असावी,” असे न्यायलयाने आदेशात म्हटले आहे.

मॉरिस निघाला पक्का ‘खिलाडी’, पिस्तुलासाठी स्वत:च्या बॉडीगार्डसोबत खेळली चाल

मॉरिसने घोसाळकर यांच्या हत्येसाठी वापरलेली बंदूक ही त्यांच्या बॉडीगार्ड असल्याचं तपासात समोर आलं होतं. अमरेंद्र मिश्रा नावाच्या व्यक्तीला 2002 मध्ये पिस्तूलाचं लायसन्स मिळालं होतं. मिश्राने उत्तर प्रदेशातून पिस्तुल नुतनीकरण केल्याचेही पुरावेदेखील समोर आले आहेत. हीच पिस्तुल मॉरिसने घोसाळकर यांच्या हत्येसाठी वापरली आहे. आम्हाला ती अट मान्य नव्हती मात्र कामाची गरज असल्याने अमरेंद्र मिश्रा तयार झाले, असे त्यांच्या पत्नीने सांगितले होते. घटनेच्या वेळी माझ्या पतीला मॉरिसने त्याचा मित्र मेहुल पारेखसोबत रूग्णालयात पाठवले होते. मेहुलची आई करुणा रुग्णालयात एडमिट आहे तिकडे हे दोघेही गेले होते.आम्हाला घटनेची माहिती पोलिसांकडून रात्री ३ वाजता मिळाली त्यावेळी धक्का बसला.

सोनी मिश्रा यांनी सांगितल्यानुसार मॉरिस भाईच्या डोक्यात सर्व काही आधीच ठरलं होतं. अभिषेक घोसाळकर यांना संपवणार असल्याचं वारंवार ते बोलत असल्याचं त्याच्या पत्नीने जबाबात म्हटलं आहे. मॉरिस भाई याने हत्सेसाठी बंदुक मिळवण्यासाठी परवाना असलेला बॉडीगार्डलाच कामावर ठेवलं. कामावर ठेवताना त्याने गन कायम कार्यालयातील ड्रॉव्हरमध्ये ठेवायची अशी अट घातली होती. एकंदरित मॉरिस भाईने बॉडीगार्डसोबतच मोठा डाव खेळला.