
मुंबई : मुंबईमधील दहिसर येथे ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तथाकथित नगरसेवक म्हणून मिरवणाऱ्या मॉरिस भाई याने कार्यालयात बोलावून घेत फेसबुक लाईव्ह करत गोळ्या घातल्या. या प्रकरणामध्ये सर्वांना प्रश्न पडलाय की मॉरिस भाईने गोळ्या मारल्यावर स्वत:ला कसं संपवलं? याबाबत सर्वात मोठी माहिती समोर आली आहे.
अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस भाई यांच्यामध्ये खटके उडाले होते. एका प्रकरणामध्ये मॉरिस भाई जेलमध्ये गेला होता. आपल्याला जेलमध्ये पाठवण्यासाठी घोसाळकर यांचाची हात असल्याचा त्याचा समज होता. जेलमधून बाहेर आल्यावर शांत डोक्याने त्याने प्लॅन केला. मॉरिसच्या पत्नीने दिलेल्या जबाबाप्रमाणे तो अभिषेक घोसाळकर यांना संपवणार असल्याचं कायम बोलत आला होता.
मॉरिसने गुरूवारी अभिषेक घोसाळकर यांना एका कार्यक्रमासाठी बोलावलं. फेसबुक लाईव्ह करत आता समाजसेवेसाठी आम्ही एकत्र काम करत असल्याचं त्याने सांगितलं. फेसबुक लाईव्ह संपत आल्यावर त्याने शेवटला दोन शब्द बोला घोसाळकरांना म्हणाला. तितक्यात त्याने गन काढली आणि घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला.
या गोळीबारामध्ये मॉरिस भाई याने घोसाळकर यांच्यावर पाच राऊंड फायर केले. तर यामधील चार गोळ्या घोसाळकरांना लागल्या होत्या. घोसाळकर बाहेर पळून जात होते मात्र जखमी अवस्थेत ते बाहेर रस्त्यावर पडले. प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार त्याच्या तोंडातून रक्त येत होतं. त्यानंतर त्यांना जवळच्या करूणा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं.
गोळ्या मारताना मॉरिस भाई याने संपूर्ण गन खाली केली होती. त्यानंतर मॉरिस याने त्याच्या ऑफिसमधील पोटमाळ्यावर पुन्हा गोळ्या भरल्या. त्यानंतर स्वत: च्या डोक्यात गोळी मारून घेत आत्महत्या केली. घोसाळकर यांना रूग्णालयात नेण्यात आलं होतं मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.