Video | कल्याणमध्ये फिल्मी थरार, पोलीस व्हॅनवर हल्ला करुन आरोपीला पळवलं

| Updated on: Feb 04, 2021 | 3:12 PM

मोबाईल स्नॅचिंग प्रकरणातील आरोपीला घेऊन जाणाऱ्या क्राईम ब्रँचच्या पोलिसांवर कल्याण पश्चिमेकडील इराणी वस्तीमधील लोकांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे.

Video | कल्याणमध्ये फिल्मी थरार, पोलीस व्हॅनवर हल्ला करुन आरोपीला पळवलं
Follow us on

कल्याण : मोबाईल स्नॅचिंग प्रकरणातील आरोपीला घेऊन जाणाऱ्या क्राईम ब्रँचच्या पोलिसांवर कल्याण पश्चिमेकडील इराणी वस्तीमधील लोकांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. आरोपीच्या साथीदारांनी आणि त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या पथकावर जीवघेणा हल्ला करुन, आरोपीला पोलीस व्हॅनमधून काढून हल्लेखोर पसार झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (accomplices of thief attacked on police van and abducted the accused in Kalyan)

मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला वसई क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी इराणी वस्तीजवळ ताब्यात घेतले होते. रेल्वे फाटक बंद असल्याने पोलिसांची कार फाटकाजवळ थांबली होती. आरोपीच्या साथीदारांनी आणि इराणी नातेवाईकांनी पोलिस पथकावर दगडफेक सुरु केली. त्यात दोन पोलीस जखमी झाले आहेत. पोलिस कारमध्ये बसलेल्या आरोपीला घेऊन इराणी हल्लेखोर पसार झाले आहेत. ही घटना आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

2008 पासून इराणी वस्तीत गेलेल्या पोलिसांवर हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटनेचा तपास खडकपाडा पोलीस करीत आहेत. कल्याण पश्चिमेकडील आंबिवली परिसरात असलेली इराणी वस्ती ही चोरांची वस्ती म्हणून ओळखली जाते. राज्यासह देशभरातील अनेक गुन्ह्यांच्या घटनांमधील आरोपी या वस्तीत राहतात. पोलीस जेव्हा या वस्तीत कारवाईसाठी जातात, तेव्हा पोलिसांवर अशाच प्रकारचा हल्ला केला जातो आणि आरोपींना पळवून नेले जाते अथवा तसा प्रयत्न केला जातो. यात अनेकदा पोलीस जखमी झाले आहेत.

व्हिडीओ पाहा

Kalyan | कल्याणमध्ये आंबिवली परिसरात आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवर जीवघेणी हल्ला

‘क्राईम पेट्रोल’, ‘दृश्यम’चा इफेक्ट, खेळताना पुन्हा पुन्हा ‘राज्य’ आल्यानं मित्राला गाडलं

‘दृश्यम’ हा हिंदी सिनेमा आणि ‘क्राईम पेट्रोल’ ही मालिका पाहून मित्रानेच मित्राची हत्या केली. केवळ हत्या करून तो थांबला नाही तर मित्राला त्याच्याच घराच्या जवळ गाडल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पुण्यातील कोथरूडमधील केळेवाडी परिसरात ही घटना घडली आहे. केळेवाडी परिसरात राहणारा 11 वर्षीय विश्वजित विनोद वंजारी हा सकाळी घराबाहेर पडला होता. पण तो घरीच न आल्याने 29 जानेवारी रोजी त्याच्या पालकांनी पोलिसात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता त्याच्याच घराजवळ अर्धवट गाडलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. दगडाने डोकं ठेचून त्याचा खून केल्याचं प्रथम दर्शनी समोर आलं. त्यामुळे सर्वचजण घाबरले. अचानक झालेल्या या प्रकारावर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. पोलिसांनीही तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यात एका ठिकाणी विश्वजित सोबत त्याचा १३ वर्षाचा मित्र आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली. त्याची चौकशी करत असताना अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेले.

कारण ऐकलं अन् पोलीसही चक्रावले

चौकशी सुरू असताना विश्वजीतच्या मित्राने सांगितलेलं कारण अत्यंत धक्कादायक होतं. आम्ही खेळत असताना विश्वजीत माझ्यावर सारखं राज्य आणायचा. सतत पराभूत होत असल्याने मला अपमानास्पद वाटायचं. त्याचा राग यायचा. त्या दिवशी माझ्या रागाचा पारा चढला. त्यामुळे मी विश्वजीतला धक्का दिला. त्यात तो जखमी झाला, असं या मुलाने सांगितलं. या घटनेने मी घाबरून गेलो होतो. त्यानंतर मी विश्वजीतच्या डोक्यात दगड टाकला आणि जवळच असलेल्या दगडांनी त्याला ठेचून मारलं.

हेही वाचा

VIDEO | धपाक धपाक धूम, विरार भाजी मार्केटजवळ फ्री स्टाईल हाणामारी

दोन वर्षात 15 घरफोड्या, भंडाऱ्यात सहा दरोडेखोरांना अटक, सोने-चांदीसह साडे 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

दारुची बाटली आणायला नकार, मित्रांकडून मित्राचा भोसकून खून, दोघांना बेड्या

(accomplices of thief attacked on police van and abducted the accused in Kalyan)