Ahmednagar Crime : आधी अपहरण नंतर धर्मांतर, लैंगिक अत्याचारामुळे मुलगी गर्भवती, नराधम जेरबंद

आरोपीने 2019 मध्ये 13 वर्षाची असताना पीडितेला बळजबरीने शाळेतून उचलून नेले आणि तिचे धर्मांतर केले. त्यानंतर तिच्याशी निकाह करुन तीन वर्षापासून तिचा शारिरीक आणि मानसिक छळ करत होता. आता ही मुलगी 16 वर्षाची असून ती गर्भवती आहे.

Ahmednagar Crime : आधी अपहरण नंतर धर्मांतर, लैंगिक अत्याचारामुळे मुलगी गर्भवती, नराधम जेरबंद
आरोपी इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कटर
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 22, 2022 | 4:48 PM

शिर्डी : तीन वर्षापूर्वी 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण (Kidnapping) करुन तिचे बळजबरीने धर्मांतर करत तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या (Arrest) आहेत. इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कटर (35) असे या आरोपीचे नाव आहे. श्रीरामपूर शहरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी इम्रान हा आधीच विवाहित आहे. गेली वर्षे पीडितेचे नातेवाईक पोलिसांकडे मदतीची याचना करत होते. मात्र त्यांना काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. यानंतर श्रीराम सेनेला या प्रकरणाबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरुन फिर्याद दाखल करण्याचे आदेश दिले.

आरोपीने 2019 मध्ये 13 वर्षाची असताना पीडितेला बळजबरीने शाळेतून उचलून नेले आणि तिचे धर्मांतर केले. त्यानंतर तिच्याशी निकाह करुन तीन वर्षापासून तिचा शारिरीक आणि मानसिक छळ करत होता. आता ही मुलगी 16 वर्षाची असून ती गर्भवती आहे. गर्भवती राहिल्यानंतरही तिचा शारिरीक छळ सुरुच होता. अत्याचार करणारा आरोपी हा विवाहित असून शहरातील वॉर्ड क्रमांक 2 मध्ये वास्तव्यास आहे.

न्यायासाठी पीडित कुटुंबाची तीन वर्ष फरफट

घटना घडल्यानंतर पिडीतीच्या आईने कुटुंबाने वेळोवेळी श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवले मात्र स्थानिक पोलीस निरिक्षक संजय सानप यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला आहे. तीन वर्ष पोलिस स्टेशनचे उंबरठे झिजवूनही पिडीतेची तक्रार स्थानिक पोलिस दाखल करून घेत नव्हते. अखेर श्रीराम सेना पीडित कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे आली. श्रीराम सेनेने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी अतिरिक्त पोलिस अधिक्षक, विभागीय पोलिस अधिकारी‌ यांना या प्रकरणी फिर्याद दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आरोपी इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कटर यास पोलिसांनी अटक केली.

अत्याचारानंतर मुलगी गर्भवती असल्याने अपहरण, बलात्कार, पोक्सो तसेच अट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक केली असली तरी त्याला सहकार्य करणारे साथीदार, फिर्याद दाखल करण्यासाठी टाळाटाळ करणारे पोलिस निरिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी श्रीराम सेनेचे राज्य अध्यक्ष सागर बेग यांनी केली आहे.

आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याची परिसरात प्रचंड दहशत

आरोपी इम्रान कुरेशी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याची या परिसरात मोठी दहशत आहे. आरोपीने याआधीही परिसरातील अल्पवयीन मुलींसोबत असे प्रकार केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. मात्र आरोपीची प्रचंड दहशत असल्याने त्याच्याविरोधात तक्रार देण्यास कुणी पुढे येत नव्हते. सदर प्रकरणात श्रीरामपुर स्थानिक पोलिसांकडून दिरंगाई झाल्याने नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. श्रीरामपूर शहरात प्रचंड गुन्हेगारी वाढली आहे. अत्याचार, अपहरण, धर्मांतर, निकाह अशी गंभीर घटना घडूनही पोलिस निरिक्षकांनी घटनेची तातडीने दखल घेतली नाही. त्यामुळे लोकप्रतिनीधींनी आगामी काळात अधिवेशनात याबाबत आवाज उठवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (Accused arrested in case of kidnapping, convert and assault of minor girl in Ahmednagar)