AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hyderabad Drug Raid : मुलगी निहारिका कोनिडेलाला पबमध्ये ताब्यात घेतल्यानंतर नागा बाबूची प्रतिक्रिया

निहारिकासह बिग बॉस तेलुगु विजेता राहुल सिपलीगंजलाही पोलिसांनी ताब्यात घेतलेय. बंजारा हिल्स येथील रॅडिसन ब्लू प्लाझा हॉटेलमधील मिंक पबमध्ये रविवारी पहाटे 3 वाजता हैदराबाद पोलिसांनी छापा टाकून एकूण 150 जणांना ताब्यात घेतले.

Hyderabad Drug Raid : मुलगी निहारिका कोनिडेलाला पबमध्ये ताब्यात घेतल्यानंतर नागा बाबूची प्रतिक्रिया
नागा बाबू आणि निहारिका कोडिनेलाImage Credit source: Pinkvilla
| Edited By: | Updated on: Apr 04, 2022 | 12:15 AM
Share

नवी दिल्ली : साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक नागा बाबू (Naga Babu)ची मुलगी आणि अभिनेत्री निहारिका कोनिडेला (Niharika Kodinela)ला रविवारी पहाटे हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले. नागा बाबू यांनी आपल्या मुलीचा ड्रग्जशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. “माझी मुलगी निहारिका हिला काल रात्री एका पंचतारांकित हॉटेलमधील पबमध्ये उपस्थित असल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले. निर्धारित वेळेनंतरही पब सुरु ठेवल्याने पोलिसांनी व्यवस्थापनावर कारवाई केली. तथापि, पोलिसांनी पुष्टी केली आहे. या पबमधून जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही.” असे नागा बाबूने आपल्या निवेदनात म्हटले आहे. (Actor Naga Babu’s reaction after detained daughter Niharika Conidella in a pub)

निहारिकाला पोलिसांनी ताब्यात घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

निहारिकासह बिग बॉस तेलुगु विजेता राहुल सिपलीगंजलाही पोलिसांनी ताब्यात घेतलेय. बंजारा हिल्स येथील रॅडिसन ब्लू प्लाझा हॉटेलमधील मिंक पबमध्ये रविवारी पहाटे 3 वाजता हैदराबाद पोलिसांनी छापा टाकून एकूण 150 जणांना ताब्यात घेतले. यावेळी पबच्या परिसरातून लाखो रुपयांचे ड्रग्जही पोलिसांनी जप्त केले आहे. निहारिका आणि राहुलने ड्रग्ज घेतले होते की नाही याबाबत अद्याप पोलिसांनी माहिती दिली नाही. याबाबत नागा बाबू यांनी स्पष्टीकरण दिले आहे. निहारिकाला पोलिसांनी ताब्यात घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

निहारिकाला ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला हैदराबाद पोलिसांकडून दुजोरा

निहारिकाला ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला हैदराबाद पोलिसांनी दुजोरा दिला आहे. टास्क फोर्सने शनिवारी रात्री उशिरा रात्री पार्टी करणे आणि ड्रग्सचे वितरण केल्याच्या आरोपावरून शहरातील पंचतारांकित हॉटेलच्या पबवर छापा टाकला. काल रात्री सुमारे 150 लोक एका पबमध्ये पार्टी करत होते. मध्यरात्रीनंतर पब चालवण्यास परवानगी नाही, असे पोलिसांनी सांगितले. (Actor Naga Babu’s reaction after detained daughter Niharika Conidella in a pub)

इतर बातम्या

Bharti Singh: ‘मुलगा झाला!’ कॉमेडियन भारतीच्या पतीनं दिली खूशखबर, कसे आहेत बाळ-बाळंतीण?

Subodh Bhave सांगणार चित्रपटसृष्टीतील रंजक कथा; ‘बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे’ची उत्सुकता

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.