कंडोम नाही म्हणून फेविक्विकचा वापर, शारीरिक संबंध करताना विचित्र प्रयोग करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

काही गोष्टी नैसर्गिक असतात. त्या निसर्ग नियमानेच करायच्या असतात. पण निसर्ग नियमाच्या विरोधात जावून वेगळा काही प्रयोग केला तर तो प्रकार अंगलटी येऊ शकतो. गुजरातच्या अहमदाबाद शहरात असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.

कंडोम नाही म्हणून फेविक्विकचा वापर, शारीरिक संबंध करताना विचित्र प्रयोग करणाऱ्या तरुणाचा मृत्यू
कंडोम नाही म्हणून फेविक्विकचा वापर, शारीरिक संबंध करताना विचित्र प्रयोग करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

गांधीनगर : काही गोष्टी नैसर्गिक असतात. त्या निसर्ग नियमानेच करायच्या असतात. पण निसर्ग नियमाच्या विरोधात जावून वेगळा काही प्रयोग केला तर तो प्रकार अंगलटी येऊ शकतो. गुजरातच्या अहमदाबाद शहरात असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने तरुणीसोबत शरीर संबंध ठेवताना कंडोम नाही म्हणून स्वत:च्या प्रायव्हेट पार्टला फेविक्विक लावण्याचा प्रयोग केला. पण हा प्रयोग त्याच्या अंगाशी आला. फेविक्विकमुळे मल्टिपल ऑर्गन फेलियर झाल्याने त्याचा मृत्यू झाला. मृतक हा ड्रग्जचं देखील सेवन करायचा, अशी देखील माहिती समोर आली आहे.

सोबत फेविक्विक ठेवण्यामागे वेगळं कारण

संबंधित घटना ही अहमदाबाद शहरातील फतेहवाडी परिसरात घडली आहे. मृतक 25 वर्षीय तरुणाला ड्रग्जच्या सेवनाचं व्यसन होतं. तो आपल्या गर्लफ्रेंडसोबत एका हॉटेलमध्ये गेला होता. दोघांनी ड्रग्जचं सेवन करुन शारीरिक संबंध बनवण्याचा निर्णय घेतला होता. पण ते हॉटेलमध्ये येताना कंडोम विसरले होते. यावेळी त्यांच्याजवळ फेविक्विक होतं. त्यांच्याकडे फेविक्विक राहण्यामागे एक वेगळं कारण होतं. व्हाईटनरमध्ये असणाऱ्या द्राव्यात मिसळून त्या द्राव्याचं ते ड्रग्स म्हणून सेवन करणार होते. कारण त्याच्याने देखील नशा येते, असा त्यांचा समज होता.

तरुणाने प्रायव्हेट पार्टला फेविक्विक का लावलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडसोबत शरीर संबंध ठेवण्याआधी सावधानतेचा मार्ग म्हणून कंडोमचा विचार केला. पण त्यावेळी त्यांच्याकडे कंडोम नव्हतं. पण शारीरिक संबंधादरम्यान नको असलेली गर्भधारणा झाली तर? या विचाराने त्याने आपल्या लिंगाला फेविक्विक लावलं होतं. पण त्याचा हा प्रयोग चुकीचा ठरला.

अहमदाबादच्या जिल्हा रुग्णालयात मृत्यू

या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी तो शहरातील अंबर टॉवरजवळ बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. तो ड्रग्जचं सेवन करत असल्याने तो बेशुद्ध झाला असेल असं त्याच्या आई-वडिलांना वाटलं. पण बराच वेळ झाल्यानंतरही त्याने डोळे उघडले नाहीत तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी त्याला अहमदाबादच्या जिल्हा रुग्णालयात नेलं. पण तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांचा प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न

तरुणाच्या मृत्यूनंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी रुग्णालयात पोहोचून सगळी माहिती घेतली. त्यानंतर तरुण आधीच्या दिवशी कोणत्या हॉटेलमध्ये गेला होता त्याचा शोध पोलिसांनी घेतला. त्या हॉटेलच्या सीसीटीव्हीत तरुण आणि त्याची प्रेयसी दिसत आहेत. हॉटेलच्या सीसीटीव्हीत जे दृश्य दिसत आहेत त्यानुसार हॉटेलमध्ये तरुणासोबत दोन मुली आल्या होत्या. त्यापैकी एक मुलगी ही लगेच स्कुटी घेऊन निघून जाते. तर दुसऱ्या मुलीसोबत तरुण ही हॉटेलमध्ये एका खोलीत जातो. मेडिकल रिपोर्टनुसार, मृतकाचा मृत्यू हा त्याने प्रायव्हेट पार्टमध्ये फेविक्विक चिपकावल्याने झाला आहे. कारण त्यामुळे त्याचे मल्टीपल ऑर्गन फेलियर झाले आहेत. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

हेही वाचा :

सुनेला भाडेकरुसोबत विचित्र परिस्थित बघितलं, संतापाचा पारा चढला, सासऱ्याने मध्यरात्री पाच जणांना संपवलं, हत्येचा भयानक थरार

ती फक्त माझीच होणार, मुलीसाठी दोस्ती तोडली, धारदार शस्त्राने हत्या, नागपूर हादरलं

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI