AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माहेरकडून जमीन मिळाली, तरीही वाद, मुलीने आईला दगडावर आपटून मारलं!

सुरुवातीला आई पडली आणि तिच्या डोक्याला लागल्याने तिचा मृत्यू झाला, असा बनाव कविताने केला होता. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच तिने आईच्या हत्येची कबुली दिली. (Akola Daughter Kills Mother)

माहेरकडून जमीन मिळाली, तरीही वाद, मुलीने आईला दगडावर आपटून मारलं!
अकोल्यात सख्ख्या मुलीकडून आईची हत्या
| Updated on: Mar 12, 2021 | 1:26 PM
Share

अकोला : अकोल्यात आईची हत्या केल्याप्रकरणी मुलीला अटक करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहारातून सख्ख्या मुलीनेच आपल्या आईला संपवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. माहेरकडून जमीन मिळाल्यानंतरही आर्थिक देवाणघेवाणीवरुन वाद झाला. अखेर मुलीने आईला दगडावर आपटून मारलं. (Akola Daughter Kills Mother over Land Financial Transaction)

सरुबाई काशीनाथ कांडेलकर यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र पोलिसांनी सरुबाई यांची मुलगी कविता दिनकर बायस्कर हिला ताब्यात घेतल्यानंतर तिची कसून चौकशी केली. आणि हत्येचं गुपित उघडं पडल्याचं पोलिसांनी सांगितलं.

आई पडल्याचा बनाव

अकोल्यातील गौरक्षण रोड परिसरात काल हे हत्याकांड घडलं. या प्रकरणी खदान पोलिसांनी आरोपी मुलगी कविता दिनकर बायस्कर हिला ताब्यात घेतलं. त्यानंतर मुलीने आपल्या आईच्या हत्येची कबुली दिली. सुरुवातीला आई पडली आणि तिच्या डोक्याला लागल्याने तिचा मृत्यू झाला, असा बनाव कविताने केला होता. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच तिने आईच्या हत्येची कबुली दिली.

सात गुंठे अधिक जमीन मिळूनही असमाधानी

तीन मुलीच असल्याने आईने तिघींच्याही नावाने शेतीवाडी आणि इतर प्रॉपर्टी करून दिली होती. कविताला सात गुंठे जमीन अधिक देण्यात आली होती. ते गुंठे कविताने विकल्यानंतर आईने तिला त्यातील एक लाख रुपये मागितले. पैसे देण्याच्या कारणावरुन कविता आणि आईमध्ये वाद झाला. त्यानंतर कविताने आईला दगडावर आपटून तिचा खून केला.

पुण्यात प्रेमसंबंधातून आईची हत्या

प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या आईची 19 वर्षीय तरुणाने हत्या केल्याचं पुण्यात उघडकीस आलं. हत्येसाठी तरुणाच्या 26 वर्षीय प्रेयसीनेही त्याला साथ दिली होती. त्यानंतर पोलिसांनी प्रेमी युगुलाला बेड्या ठोकल्या. मायलेकाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली.

संबंधित बातम्या :

पतीनिधनानंतर शेजाऱ्याशी सूत जुळले, लग्नाला विरोधाची भीती, महिलेची प्रियकरासह आत्महत्या

आधी तिनं नवऱ्याला पॉर्न व्हिडीओ दाखवले, नंतर खुर्चीला बांधलं आणि पुढं जे केलं त्यानं महाराष्ट्र हादरला !

(Akola Daughter Kills Mother over Land Financial Transaction)

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.