पतीनिधनानंतर शेजाऱ्याशी सूत जुळले, लग्नाला विरोधाची भीती, महिलेची प्रियकरासह आत्महत्या

तिला दोन अपत्यं असल्याने कदाचित कुटुंबीयांनी दोघांच्या विवाहाला विरोध केला असावा. याच नैराश्यातून दोघांनी आत्महत्या केली असावी, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. (Bhandara Widow Suicide Boyfriend)

पतीनिधनानंतर शेजाऱ्याशी सूत जुळले, लग्नाला विरोधाची भीती, महिलेची प्रियकरासह आत्महत्या
भंडाऱ्यात विधवा प्रेयसीची प्रियकरासह आत्महत्या

भंडारा : विधवा प्रेयसी आणि तिला असलेल्या दोन अपत्यांमुळे कुटुंबीय विवाहाला मान्यता देणार नाही, अशा विचारातून तरुण प्रियकराने महिलेसोबत आत्महत्या केली. भंडारा जिल्ह्यात घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. वैनगंगा नदीत उडी घेऊन दोघांनी आयुष्य संपवलं. (Bhandara Widow Lady commits Suicide with Boyfriend)

शेजारी युवकाशी प्रेमसंबंध जुळले

29 वर्षीय नाशिक बावनकुळे आणि 33 सोनम (काल्पनिक नाव) असं आत्महत्या करणाऱ्या प्रेमी युगुलाचं नाव आहे. हे दोघेही भंडारा शहरातील शुक्रवारी वार्डातील रहिवासी आहे. दोघांचीही घरे एकमेकांच्या शेजारी आहेत. सोनम यांच्या पतीचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. सोनमला 14 वर्षाचा मुलगा आणि 11 वर्षाची मुलगी आहे. सोनम आणि नाशिक हे शेजारी राहत असल्याने दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले.

‘साथ जियेंगे साथ मरेंगे’

दोघांनी एकमेकांसोबत ‘साथ जियेंगे साथ मरेंगे’ च्या आणाभाका केल्या. मात्र, सोनम नाशिकपेक्षा वयाने मोठी होती. ती विधवा होती. तसंच तिला दोन अपत्यं असल्याने कदाचित कुटुंबीयांनी दोघांच्या विवाहाला विरोध केला असावा. याच नैराश्यातून दोघांनी आत्महत्या केली असावी, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

प्रेयसीच्या हत्येनंतर तरुणाची आत्महत्या

अल्पवयीन मुलीची लॉजमध्ये नेऊन हत्या केल्यानंतर तरुणाने आत्महत्या केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी पुण्यात उघडकीस आली होती. मुलीच्या हत्येनंतर पोलीस या तरुणाचा शोध घेत होते. यानंतर 48 तासांनी त्याचा मृतदेह हाती लागला होता. आपलं पहिलं आणि अखेरचं प्रेम संपलं असून मी या जगाचा निरोप घेतोय, असं व्हॉट्सअप स्टेटस या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी ठेवलं होतं. यानंतर इंद्रायणी नदीत उडी घेऊन या तरुणाने जीवन संपवलं होतं.

दुसरीकडे, प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या आईची 19 वर्षीय तरुणाने हत्या केल्याचं पुण्यात उघडकीस आलं. हत्येसाठी तरुणाच्या 26 वर्षीय प्रेयसीनेही त्याला साथ दिली होती. त्यानंतर पोलिसांनी प्रेमी युगुलाला बेड्या ठोकल्या. मायलेकाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली.

संबंधित बातम्या :

26 वर्षीय प्रेयसीसोबत प्रेमसंबंधात अडथळा, पुण्यात 19 वर्षीय तरुणाकडून आईची हत्या

अगोदर प्रेयसीची लॉजवर नेऊन हत्या, नंतर तरुणाची इंद्रायणी नदीत आत्महत्या

(Bhandara Widow Lady commits Suicide with Boyfriend)

Published On - 10:46 am, Fri, 12 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI