पालिकेच्या भवनातच सफाई कर्मचारी म्हणतात या बसुया, पुन्हा एक दारू पार्टी

काही वेळा सरकारी कर्मचाऱ्यांच्या आरेरावीचे व्हिडिओही समोर येतात. अंबरनाथ पोलिकेच्या युपीएससी भवनात जे झालंय, ते पाहून मात्र तुम्हीही तोंडात बोट घालाल.

पालिकेच्या भवनातच सफाई कर्मचारी म्हणतात या बसुया, पुन्हा एक दारू पार्टी
सरकारी कार्यालयात दारु पार्टी
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 17, 2022 | 5:12 PM

ठाणे : गेल्या काही दिवसात अनेक सरकारी कार्यालयात (Government Office)  कर्माचाऱ्यांची मनमर्जी होताना पाहायला मिळाली आहे. काही वेळा सरकारी कर्मचाऱ्यांच्या आरेरावीचे व्हिडिओही समोर येतात. अंबरनाथ पोलिकेच्या युपीएससी भवनात जे झालंय, ते पाहून मात्र तुम्हीही तोंडात बोट घालाल. कारण महापालिकेच्या यूपीएससी भवनात (UPSC Bhavan) कर्मचऱ्यांनीच चक्का दारू पार्टी (Liquor Party) केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. गेल्या अनेक दिवसात सरकारी कार्यालयात दारु पार्टी होण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र या बाहदरांनी यातूनही धडा घेतला नाही. चक्क पालिका भावनातच पार्टी केलीय. त्यामुळे महापालिका प्रशानाच्या कारभारावर आता सवाल उपस्थित झालाय. या पार्टीचा हा व्हिडिओ सोशल मिडीयवर प्रचंड व्हायरल होत आहे.

सफाई कर्मचारी बेभान

सफाई कर्मचारी पालिकेच्या इमारतीतच चक्क बाटल्या घेऊन पार्टीला बसलेले या व्हिडिओत दिसत आहेत. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांच्या शिस्तीवरही आता सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. आपण पालिका भवनात आहोत याचेही भान या सफाई कर्मचाऱ्यांना उललेले दिसून येत नाहीये. त्यामुळे आता स्थानिकही आक्रमक होण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य नागरिकाने एखादा नियम मोडला तरी कारवाई करणारी पालिका आता त्यांच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबतीत गप्प का? असा सवाल विचारला जातोय. पार्टीचे व्हिडिओ बाहेर येऊनही पालिकेकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये.

गेल्या काही दिवसात व्हिडिओंचा बोलबाला

गेल्या काही महिन्यात अशा अनेक पार्टीचे व्हिडिओ समोर आले आहेत. कधी सरकारी कार्यालय तर कधी पालिका कार्यलय, अशा पार्टी सर्रास होताना दिसून येत आहेत, मात्र अशा पार्ट्या कधी बंद होणार? असा सवाल नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी तर चक्का मंत्रालयात दारुच्या बाटल्यांचा खच आढळून आल्याने खळबळ माजली होती. या दारु पार्टींपासून मंत्रालयही सुटले नाही का? असा सवाल आता पुन्हा एकदा अशा पार्टीने उपस्थित केला आहे.

Wardha Accident | नादुरूस्त टिप्परवर धडकली Travels; एक ठार, तीन गंभीर

Video : कांदिवलीत दिवसाढवळ्या तुंबळ हाणामारी, कांदिवली की वासेपूर? स्थानिकांचा सवाल

Pune Crime| पुण्यात प्रेम प्रकरणातून मारहाण, तरुणाचा मृत्यू ; नेमक काय घडलं?