Wardha Accident | नादुरूस्त टिप्परवर धडकली Travels; एक ठार, तीन गंभीर

नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर पिपरी (पोहणा) गावालगत नादुरुस्त टिप्पर उभी होती. या उभ्या असलेल्या नादुरुस्त टिप्परवर भरधाव ट्रॅव्हल्स धडकली. यात एक जण जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. या अपघातात जगत बहादुरसिंग हे ठार झाले.

Wardha Accident | नादुरूस्त टिप्परवर धडकली Travels; एक ठार, तीन गंभीर
वर्धा येथे झालेल्या अपघातात एक जण ठार झाला, तर तीन जण जखमी झाले. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 4:48 PM

वर्धा : नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाने (Nagpur Hyderabad National Highway) छत्तीसगडकडे भरधाव ट्रॅव्हल्स जात होती. ट्रॅव्हल्स चालकाचे पिपरी (पोहणा)जवळ नियंत्रण सुटले. त्यामुळं ट्रॅव्हल्स नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेला टिप्परवर धडकली. हा भीषण अपघात बुधवारी रात्रीच्या सुमारास घडला. यात ट्रॅव्हल्सचा दुसरा चालक दुर्ग (छत्तीसगड) जिल्ह्यातील चांदखुरी येथील जगत बहादुरसिंग (वय 58) हा जागीच ठार झाला. इतर तीन जण जखमी झाले. या अपघाताची माहिती पिपरी पोहणा येथील नागरिकांना (Citizens at Pipri Pohna) मिळाली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रॅव्हल्समधील लोकांना बाहेर काढले. जाम महामार्ग पोलीस (Highway Police) तत्काळ घटनास्थळी पोहचले. गंभीर जखमींना उपचारासाठी तातडीने सेवाग्राम रुग्णालयात रवाना केले.

नागरिकांनी केली प्रवाशांच्या भोजनाची व्यवस्था

पिपरी (पोहणा) गावाजवळ रात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातात ट्रॅव्हल्समधील प्रवासी जरा भयभित झाले होते. यावेळी पिपरी (पोहणा) येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व प्रवाशांना धीर देत जवळपास 100 प्रवाशांना गावातील बुध्द विहारात घेऊन गेले. त्याठिकाणी सर्वांना पोटभरून जेवण देत त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली.

रस्त्याशेजारील उभी वाहने धोकादायक

रस्त्याच्या बाजूला काही ठिकाणी अशाप्रकारे काही वाहन उभी असतात. हे अतिशय धोकादायक आहे. अशा वाहनांमुळं काही वेळा अपघात होतात. यात काहींचा जीव जातो. तर, काही जखमी होतात. त्यामुळं वाहन रस्त्यालगत ठेवताना काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा अशाप्रकारे विनाकारण काही लोकांचा जीव जाऊ शकतो. शिवाय वाहनं चालविताना ते काळजीपूर्वक चालविले पाहिजे. अतिवेगाने वाहन चालविणे म्हणजे अपघाताला आमंत्रण होय, हे लक्षात घेतले पाहिजे.

Video – फडणवीस, गडकरी यांनी एकमेकांना भरविला विजयाचा पेढा, नागपुरात दोघांचाही जल्लोषात सत्कार

Devendra Fadnavis | गोवा तो झाकी हैं, महाराष्ट्र अभी बाकी हैं; देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात निर्धार

Gadchiroli Naxal | गडचिरोलीत 2 जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, 20 लाख रुपयांचे होते बक्षीस

Non Stop LIVE Update
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला.
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?.
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?.
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?.
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?.
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?.
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला....
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला.....
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय.
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा.
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय.