Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video – फडणवीस, गडकरी यांनी एकमेकांना भरविला विजयाचा पेढा, नागपुरात दोघांचाही जल्लोषात सत्कार

विजयात दोन्ही नेत्यांचा सक्रिय सहभाग होता. याबद्दल दोन्ही नेत्यांचा आज नागपुरात भाजपच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला. विमानतळापासून रेडिसन ब्ल्यू हॉटेलपर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी दोघांनीही एकमेकांना पेढा भरवून भाजपच्या विजयाचा आनंद (the victory of BJP ) साजरा केला.

Video - फडणवीस, गडकरी यांनी एकमेकांना भरविला विजयाचा पेढा, नागपुरात दोघांचाही जल्लोषात सत्कार
नागपुरात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पेढा भरविताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 2:14 PM

नागपूर : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत चार राज्यांमध्ये भाजपला सत्ता मिळाली. या विजयाचे शिल्पकार म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Former Chief Minister Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गोव्यातील निवडणुकीच्या प्रचाराची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्याकडं होती. तर पाचही राज्यामध्ये प्रचारसभा घेण्यासाठी नितीन गडकरी रोज जात होते. या विजयात दोन्ही नेत्यांचा सक्रिय सहभाग होता. याबद्दल दोन्ही नेत्यांचा आज नागपुरात भाजपच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला. विमानतळापासून रेडिसन ब्ल्यू हॉटेलपर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी दोघांनीही एकमेकांना पेढा भरवून भाजपच्या विजयाचा आनंद (the victory of BJP ) साजरा केला.

विकासाच्या राजकारणातून देशाला वेगळी दिशा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सभेला संबोधित करताना म्हणाले, गोव्यात मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री असताना दुसऱ्यांशी तडजोड करावी लागत होती. यावेळी प्रमोद सावंत व देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली. भाजपला अपशकून करण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना यांनी कंबर कसली होती. पण, गोव्याच्या जनतेने त्यांचे काय स्थान आहे हे दाखवून दिले. उत्तराखंड, उत्तरप्रदेशमध्ये भाजपला विजय मिळाला. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युपीत आदित्यनाथ योगींच्या नेतृत्त्वात भाजपनं मोठं काम केलं. त्यामुळं जात, पात, पंथ बाजूला सारून जनतेनं भाजपवर विश्वास दाखविला. उत्तराखंड, मणिपूरमध्येही भाजपचा पाया भक्कम झाला. गरिबांचे कल्याण करून आत्मनिर्भर देश कसा होईल, हे स्वप्न मोदींनी उराशी बाळगलं आहे. सबका साथ, सबका विकास करायचं आहे. यातून राजकारणाला वेगळी दिशा मिळाली.

खरी परीक्षा नागपुरात

गडकरी म्हणाले, नागपूर महापालिका निवडणुकीमध्ये खरी परीक्षा होणार आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्तेत असताना नागपुरात रस्ते, मैदान तयार केले. मिहानला गतिशील केले. नागपुरात एम्स, ट्रीपल आयआयटी मिळालं. सिम्बाईसीस इन्स्टिट्यूट मिळालं. येथे दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. ई लायब्ररी महापौर दयाशंकर तिवारी यांनी नागपुरात तयार केली. या शहराचा चौफेर विकास केला. शहरात खाली रस्ता, वर पूल त्यावर मेट्रो आहे. चोवीस तास पाणी मिळते. अनेक प्रकल्प तयार झाले. चांगले बगीचे, रोजगार, सांस्कृतिक, क्रीडा महोत्सव यशस्वी करून दाखविलं. मनपा निवडणुकीत गेल्या वेळीपेक्षा यावेळी जास्त यश मिळवुया, असा निर्धार यावेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

पाहा व्हिडीओ काय म्हणाले, नितीन गडकरी

Devendra Fadnavis | गोवा तो झाकी हैं, महाराष्ट्र अभी बाकी हैं; देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात निर्धार

Gadchiroli Naxal | गडचिरोलीत 2 जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, 20 लाख रुपयांचे होते बक्षीस

नागपुरात 12 ते 14 वर्ष वयोगटाचे Corona प्रतिबंधक लसीकरण सुरू, शहरातील कोणत्या केंद्रांवर व्यवस्था?

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.