Devendra Fadnavis | गोवा तो झाकी हैं, महाराष्ट्र अभी बाकी हैं; देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात निर्धार

प्रवीण दरेकरांना फसविण्याचा प्रयत्न झाला. तरीही तुमच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलणं थांबणार नाही, असं फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं. शेवटी फडणवीस यांनी गोवा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, असा निर्धार केला.

Devendra Fadnavis | गोवा तो झाकी हैं, महाराष्ट्र अभी बाकी हैं; देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात निर्धार
नागपुरात सभेला मार्गदर्शन करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 1:31 PM

नागपूर : गोव्यातील भाजपच्या विजयानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Former Chief Minister Devendra Fadnavis) नागपुरात आले. फडणवीस यांच्या नेतृत्त्वात गोव्यात ही निवडणूक लढविण्यात आली. त्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत विराजमान होणार आहेत. हे यश मिळाण्याचं कारण देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. फडणवीस म्हणाले, गोव्यात कार्यकर्त्यांच्या मदतीने भाजपनं संधीचं सोनं केलं. गोव्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) हेही प्रचारासाठी आले होते. गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर याठिकाणी भाजपला मिळालेलं मत हे विकासाला मिळालेलं मत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देश बदलतोय. नितीन गडकरींच्या (Prime Minister Narendra Modi ) माध्यमातून रस्ते तयार होत आहेत. देशात प्रत्येकाला मोफत कोरोना लसीकरण करण्यात आलंय. वीस हजार लोकांना युक्रेनमधून काढण्यात आलं. हे भाजपप्रती असलेलं विश्वासाचं वातावरण आहे, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

मुंगेरीलाल के हसीन सपने

देवेंद्र फडणवीस म्हणाले, गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी आपले नशीब आजमावयला आले होते. पण, गोव्याच्या मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखविली. शिवसेना, राष्ट्रवादीचे हे मुंगेरीलाल के हसीनं स्वप्न होते, अशी टर फडणवीस यांनी उडविली. गोव्यात शिवसेना, राष्ट्रवादीची लढाई ही नोटाशी असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. शिवसेना, राष्ट्रवादीच्या एकाही उमेदवाराचं डिपाझिट राहीलं नाही, याची आठवण त्यांनी करून दिली.

महाविकास आघाडी नव्हे महावसुली आघाडी सरकार

राज्यात भ्रष्टाचारी सरकारविरोधात सामान्य माणूस भाजपच्या सोबत आहे. राज्यातील सरकार हे महाविकास आघाडी नाही, ही महावसुली आघाडी आहे. सरकारमधील दोन मंत्री जेलमध्ये आहेत. राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधातील लढाई शिगेला पोहचली आहे. प्रवीण दरेकरांना फसविण्याचा प्रयत्न झाला. तरीही तुमच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलणं थांबणार नाही, असं फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं. शेवटी फडणवीस यांनी गोवा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, असा निर्धार केला. महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नागपुरात 23 वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, शेजारी पेट्रोलची रिकामी बाटली

Nagpur Cultural Festival | खासदार सांस्कृतिक महोत्सव शनिवारपासून, हेमामालिनी, शंकर महादेवन येणार

Video – Nagpur Holi | लाकडं नव्हे शेणापासून तयार केलेले गो कास्ट जाळा, नागपुरात गोरक्षणनं शोधला

'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.