नागपुरात 23 वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, शेजारी पेट्रोलची रिकामी बाटली

नागपुरात 23 वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, शेजारी पेट्रोलची रिकामी बाटली
नागपुरात तरुणीचा मृतदेह सापडला
Image Credit source: टीव्ही9

नागपूरमधील वाडी पोलिस ठाण्या अंतर्गत सुराबर्डी येथील निर्जन स्थळी 23 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला. निकिता चौधरी असं युवतीचं नाव आहे. ती राणा प्रतापनगर पोलिस स्टेशन हद्दीत राहत होती.

सुनील ढगे

| Edited By: अनिश बेंद्रे

Mar 17, 2022 | 8:06 AM

नागपूर : नागपुरात (Nagpur Crime) 23 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाडी पोलिस ठाण्या अंतर्गत सुराबर्डी येथील निर्जन स्थळी तरुणी मृतावस्थेत आढळली. मृतदेहाशेजारी पेट्रोलची रिकामी बाटली आढळल्याने आधी तिची हत्या (Murder) करुन नंतर तिला जाळलं असावं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निकिता चौधरी असं युवतीचं नाव असून ती राणा प्रतापनगर पोलिस स्टेशन हद्दीतील रहिवासी असल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

नागपूरमधील वाडी पोलिस ठाण्या अंतर्गत सुराबर्डी येथील निर्जन स्थळी 23 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला. निकिता चौधरी असं युवतीचं नाव आहे. ती राणा प्रतापनगर पोलिस स्टेशन हद्दीत राहत होती.

निकिता एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करत होती. मंगळवारी ती कार्यालयात गेली. मात्र, घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी राणा प्रतापनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

मृतदेहाशेजारी पेट्रोलची रिकामी बाटली

बुधवार रात्री तिचा मृतदेह आढळल्याने एकाच खळबळ उडाली. मृतदेहाशेजारी पेट्रोलची रिकामी बाटली आढळल्याने आधी तिची हत्या करुन नंतर तिला जाळलं असावं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी याबाबत प्राथमिक तपासात अकस्मात मृत्यूची नोंद केली असली तरी कुठल्या कारणांवरून ही हत्या केली, कुणी केली या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या :

35 वर्षीय महिलेचा शेतात मृतदेह सापडला, डोक्यात दगड घालून हत्येचा संशय

जागेच्या वादातून रक्तरंजित थरार, चौघांची निर्घृण हत्या, सहा जण गंभीर

कार अडवून डोळ्यात मिर्चीपूड फेकली, भर रस्त्यात बिल्डरच्या हत्येचा थरार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें