Pune Crime| पुण्यात प्रेम प्रकरणातून मारहाण, तरुणाचा मृत्यू ; नेमक काय घडलं?

आरोपीच्या मुलीला प्रद्युम्न कांबळे नावाचा तरुण त्रास देत असल्याचा संशय आरोपीला आला. घटनेच्या दिवशी मृत तरुण दुपारी मुलीला भेटण्यासाठी तिच्या घरी आला. यावेळी मुलीच्या आईने प्रद्युम्नला घरात का आला, असे विचारले , यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्यानंतर वंदना पायगुडे यांनी प्रद्युम्नला घरात कोंडून दांडक्याने मारहाण केली.

Pune Crime|  पुण्यात प्रेम प्रकरणातून मारहाण,  तरुणाचा  मृत्यू ; नेमक काय घडलं?
प्रेमप्रकरणातील मारहाणीत तरुणाचा मृत्यूImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 4:15 PM

पुणे – गेल्या आठवडाभरात शहरात प्रेम प्रकरणातून गुन्ह्याच्या(crime) पाचहून अधिक   घटना घडल्या आहेत. पुण्यातील शिवणे परिसरात (Shivane area)  प्रेमसंबंधातून मुलीला त्रास देतो असे म्हणत तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मुलीच्या आई, भाऊ व भावांच्या मित्राने ने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू(Youth death ) झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव प्रद्युम्न कांबळे असून तो (22) वर्षांचा असल्याची माहिती समोर आली आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी या प्रकरणी मुलीची आई, भाऊ व भावाच्या मित्राला अटक केली आहे.

नेमकं काय घडलं ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवणे परिसरातील दांगट पाटील इंडस्ट्रीयल इस्टेट इथे साई श्रद्धा रेसिडन्सीमध्ये आरोपी वंदना विजय पायगुडे वास्तव्यास आहेत . या आरोपीच्या मुलीला प्रद्युम्न कांबळे नावाचा तरुण त्रास देत असल्याचा संशय आरोपीला आला. घटनेच्या दिवशी मृत तरुण दुपारी मुलीला भेटण्यासाठी तिच्या घरी आला. यावेळी मुलीच्या आईने प्रद्युम्नला घरात का आला, असे विचारले , यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्यानंतर वंदना पायगुडे यांनी प्रद्युम्नला घरात कोंडून दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. व तिथून निसटून पळू लागला. मात्र आरोपीने आपल्या त्याचा पाठलाग करत दांगट पाटील नगर इथल्या रस्त्यावर गाठत त्याला आणखी मारहाण केली.

 उपचारादरम्यानच  मृत्यू

या घटनेची माहिती मिळताच वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके आणि त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र त्यावेळी दोघे आरोपी घटना स्थळावरून पळून गेले . त्यानंतर पोलिसांनी तातडीने जखमी प्रद्युम्न कांबळेला उपचारांसाठी वारजे माळवाडी इथल्या माई मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु उपचारादरम्यानच आज सकाळी त्याचा मृत्यू झाला आहे.

सावर्डे गावातील थरकाप उडवणारा ‘होलटा शिमगा’

द काश्मीर फाईलची चर्चा सुरूच, नाना पाटेकर म्हणतात गट पडणं साहजिक पण…

ICSE, ISC Semester 2 Exams 2022 : आयसीएसईकडून बारावीच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल, नेमकं कारण काय

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.