आयएससी 12 वी सत्र परीक्षा सीआयएससीई द्वारे घेतल्या जातात. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार यावर्षीपासून परीक्षा दोन सत्रात घेण्यात येत आहेत. त्यामुळं परीक्षेची वेळ दीड तास करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचं वाचन करण्यासाठी 10 मिनिटं वेळ दिला जाणार नाही. आयएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी नवे बदल माहिती करुन घेण्याची आवश्यकता आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचं पालन करुन बारावीच्या परीक्षांचं आयोजन केलं जाणार आहे. अनेक राज्यांच्या बोर्डांकडून दहावी आणि बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
जेईई मेन परीक्षा एप्रिल सत्रातील परीक्षा आता पाच दिवस लांबणीवर टाकऱण्यात आल्या आहेत. आता परीक्षा 21 एप्रिलपासून सुरु होणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या जेईई मेन परीक्षा 2022 च्या वेबसाईटवर जाऊन यासंदर्भातील अधिक माहिती मिळवता येईल. यापूर्वीच्या वेळापत्रका प्रमाणं जेईई मेन परीक्षा 16, 17, 18, 19, 20 21 एप्रिलला होणार होत्या. आता परीक्षा 21 एप्रिल पासून सुरु होणार आहे. नव्या तारखांनुसार परीक्षा 21, 24, 25, 29 एप्रिल 2022 आणि 01 आणि 04 मे 2022 होणार आहे.
मुख्यमंत्रिपदाबाबत विचारल्यावर का भडकले विश्वजीत राणे? गोव्याच्या राजकारणात चाललंय काय?
महाविकास आघाडीच्या आमदारांनी घेतली NCP अध्यक्ष शरद पवार यांची भेट; नेमकी काय झाली चर्चा?