आई आणि पत्नीला घरात लपवून का ठेवले? विचारत नातवानेच आजोबाला…

दारूचा नाद वाईट हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होत. अशीच एक घटना उघडकीस आली. जिथे दारूच्या नादात नातवाने त्याच्या आजोबांसोबत असं कृत्य केलं...

आई आणि पत्नीला घरात लपवून का ठेवले? विचारत नातवानेच आजोबाला...
Follow us
| Updated on: Sep 05, 2023 | 3:06 PM

गोंदिया | 5 सप्टेंबर 2023 : दारूचे व्यसन (alcohol) वाईट हे सर्वांनाच माहीत आहे, पण तरीही अनेकांना ती पिणं सोडवच नाही. बरं ती प्रमाणात प्यायली तर ठीक अन्यथा तिचे अतिरिक्त सेवन फक्त पिणाऱ्याचे शरीरच नाही तर त्याचं संपूर्ण आयुष्य खराब करते. अन् त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबाचीही वाताहत होते. अशा अनेक केसेस समोर आल्या असतील, पण लोकांचे डोळे काही उघडत नाही. दारूपायी आणखी एक कुटुंब उध्वस्त झाल्याची धक्कादायक घडल्याचे उघडकीस आले आहे. तेथे एका नातवाने दारूच्या नादात असं कृत्य (crime news) केलं जे ऐकून सर्वांच्याच काळजाचा थरकाप उडाला. अख्खं गावचं हादरलं.

नक्की काय झालं ?

ही दुर्दैवी घटना गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील गिरोली गावातील आहे. तेथे दारूच्या आहारी गेलेल्या तरूणाने जे कृत्य केले ते ऐकून साऱ्या गावकऱ्यांच्या पायाखालची जमीन हादरली. दारूच्या नादात त्या तरूणाने त्याच्या वयोवृद्ध आजोबांना मारहाण केली. आई आणि पत्नीला घरात लपवून का ठेवलं, असा प्रश्न विचारत त्याने आजोबांना बेदम चोप दिला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, तो तेवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने आपल्याच आजोबांचा गळा दाबला आणि त्यांचा जीवही घेतला.

यशवंत माधो कापगते असे मृत पावलेल्या आजोबांचे नाव आहे. ते 67 वर्षांचे होते. तर रोशन अशोक कापगते असे आरोपी नातवाचे नाव असून तो अवघ्या 26 वर्षांचा आहे. दारूच्या नादात त्याने आजोबांचा जीव घेतला, त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आणि हत्या केल्याने आरोपीचेही संपूर्ण आयुष्य उध्वस्त झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखला झाले आणि त्यांनी आरोपीला अटक केली. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

शपथविधी अन् नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या बदलल्या, आता...
शपथविधी अन् नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या बदलल्या, आता....
शपथविधी होताच CM फडणवीसांसह DCM अजितदादा अन् शिंदे थेट मंत्रालयात
शपथविधी होताच CM फडणवीसांसह DCM अजितदादा अन् शिंदे थेट मंत्रालयात.
CM होताच ठाकरेंचा फडणवीसांना इशारा,'...असं जाणवलं तर जाणीव करून देणार'
CM होताच ठाकरेंचा फडणवीसांना इशारा,'...असं जाणवलं तर जाणीव करून देणार'.
गुलाबी जॅकेट, वेगळ्या पद्धतीने दादांनी घेतली सहाव्यांदा DCM पदाची शपथ
गुलाबी जॅकेट, वेगळ्या पद्धतीने दादांनी घेतली सहाव्यांदा DCM पदाची शपथ.
बाळासाहेब ठाकरेंच स्मरण अन् एकनाथ शिंदें घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
बाळासाहेब ठाकरेंच स्मरण अन् एकनाथ शिंदें घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ.
आतापासून राज्यात ‘देवेंद्र’पर्व, फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
आतापासून राज्यात ‘देवेंद्र’पर्व, फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ.
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह 'या' नेत्यांची हजेरी
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह 'या' नेत्यांची हजेरी.
'पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने...,'पतीचे कौतूक करताना अमृता म्हणाल्या
'पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने...,'पतीचे कौतूक करताना अमृता म्हणाल्या.
'शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,' काय म्हणाले अंबादास दानवे
'शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,' काय म्हणाले अंबादास दानवे.
'साहेब जो निर्णय घेणार असतील त्यामागे आम्ही..., 'काय म्हणाले सामंत
'साहेब जो निर्णय घेणार असतील त्यामागे आम्ही..., 'काय म्हणाले सामंत.