Yakub Memon: याकूब मेमन कबरीच्या वादात धक्कादायक ट्विस्ट; थेट अंडरवर्ल्डमधून धमकी आल्याचा आरोप

वनिता कांबळे

|

Updated on: Sep 09, 2022 | 4:05 PM

दक्षिण मुंबईतील मरीन लाइन्स स्थानकासमोर बडा कब्रीस्तान स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीतच मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला दफन करण्यात आले. याकूब मेमनची कबर सजवण्यात आली आहे. कबर सजवण्यासा परवानगी कुणी दिली यावरुन आता चांगलाच वाद पेटला आहे.

Yakub Memon:  याकूब मेमन कबरीच्या वादात धक्कादायक ट्विस्ट; थेट अंडरवर्ल्डमधून धमकी आल्याचा आरोप
कबर सुशोभीकरणात नवा ट्विस्ट
Image Credit source: social media

मुंबई : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन(Yakub Memon) याची कबर सजवल्याचा वाद चांगाच पेटले आहे. यावरुन राजकारण सुरु झाले असताना आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याकूब मेमनची कबर सजवण्यासाठी थेट अंडरवर्ल्डमधून धमकी आल्याचा दावा केला जात आहे. बडा कब्रीस्तान ट्रस्टच्या एका माजी ट्रस्टीने हा आरोप केला असून याबाबत पोलिसात तक्रार दाखल केल्याचा दावाही केला जात आहे. यासाठी जुम्मा मस्जिद बॉम्बे ट्रस्टला धमकवण्यात आले होते.

दक्षिण मुंबईतील मरीन लाइन्स स्थानकासमोर बडा कब्रीस्तान स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीतच मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला दफन करण्यात आले. याकूब मेमनची कबर सजवण्यात आली आहे. कबर सजवण्यासा परवानगी कुणी दिली यावरुन आता चांगलाच वाद पेटला आहे.

कबर सजवण्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. याकूबचा भाऊ टायगर मेमनच्या धमकीनंतर ही कबर सजवण्यात आल्याचा दावा बडा कब्रीस्तान ट्रस्टच्या एका माजी विश्वस्ताने केला आहे. याबाबत पोलिसात तक्रार केल्याचेही समजते.

याकूबची कबर शहीदाच्या स्मारकाने सजवा असं म्हणत ही कबर सजवण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप या विश्वस्ताने केला आहे. टायर मेमन सध्या फरार आहे.

कबर सजवण्याच्या मागणीला ट्रस्टमधील इतर सदस्यांनी विरोध केला. यामुळे त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. बडा कब्रस्तानमध्ये सुरू असलेल्या हेराफेरीबाबत त्यांनी वक्फ बोर्डाकडे तक्रारही केली होती. मात्र, याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेरीस मुंबईच्या बडा स्मशानभूमी ट्रस्टशी संबंधित एका सदस्याने ही माहिती मुंबई पोलिसांना दिली. 2020 मध्येच तक्रार देण्यात आली. मात्र, तरीही 2021 मध्ये याकूबची कबर सजवण्यात आली.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI