कोरोना संसर्गानंतर मांत्रिकाकडे उपचार, अंधश्रद्धेतून मेळघाटात 45 वर्षीय महिलेचा मृत्यू

महिलेला वैद्यकीय उपचाराला नेण्याऐवजी तिच्या नातेवाईकांनी उपचारासाठी मांत्रिकाकडे धाव घेतली. (Amravati Melghat Lady COVID Superstition)

  • सुरेंद्रकुमार आकोडे, टीव्ही 9 मराठी, अमरावती
  • Published On - 12:39 PM, 17 Apr 2021
कोरोना संसर्गानंतर मांत्रिकाकडे उपचार, अंधश्रद्धेतून मेळघाटात 45 वर्षीय महिलेचा मृत्यू
पालकांनो, कोरोनापासून लहान मुलांना सांभाळा!

अमरावती : कोरोना संसर्गानंतर वैद्यकीय उपचार करण्याऐवजी अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याने महिलेला प्राण गमवावे लागले. नातेवाईकांनी कोव्हिडच्या उपचारांसाठी मांत्रिकाकडे नेल्यामुळे 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये घडलेला हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Amravati Melghat Lady dies of COVID due to Superstition)

अमरावती जिल्ह्यातील सेमाडोह येथील महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र महिलेला वैद्यकीय उपचाराला नेण्याऐवजी तिच्या नातेवाईकांनी उपचारासाठी मांत्रिकाकडे धाव घेतली. मात्र अघोरी उपचार महिलेच्या जीवावर बेतले. त्यामुळे
45 वर्षीय महिलेचा भवई येथील मांत्रिकाकडे उपचारदरम्यान मृत्यू झाला.

अमरावतीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी या घटनेविषयी माहिती दिली. भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेल्यानंतर मेळघाटात अंधश्रद्धा कायम असल्याचं चित्र आहे.

कोरोना आणि अंधश्रद्धा

भक्तांच्या हाताचे चुंबन घेऊन त्यांना ‘कोरोना’मुक्त करण्याचा दावा करणारा भोंदूबाबा स्वतः कोरोनाग्रस्त होता. मात्र त्यानंतरही तो कोणतीही काळजी न घेता भक्तांच्या संपर्कात येत राहिला. गेल्या वर्षी 4 जून रोजी हा बाबा मरण पावला. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या भक्तांच्या ‘कोरोना’ चाचण्यांचे अहवालही पॉझिटिव्ह येऊ लागले. मध्य प्रदेशातील रतलाममध्ये हा प्रकार समोर आला होता.

आंध्र प्रदेशातील खुनी आई-वडील

उच्चशिक्षित वर्गामध्येही अंधश्रद्धेचा प्रकार गेल्या वर्षी उघडकीस आला होता. आंध्र प्रदेशातील मुख्याध्यापक दाम्पत्याने अंधश्रद्धेतून पोटच्या मुलींची हत्या केली होती. कलियुगाचा नायनाट करण्यासाठी देवानेच कोरोना व्हायरसची निर्मिती केली, असा बिनडोक दावा दाम्पत्याने केला होता. दोन्ही मुलींची हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहांशेजारी आरोपी आईने गाऊन नृत्य केलं. सतयुग सुरु होणार असल्यामुळे सूर्योदयाला दोन्ही लेकी पुन्हा जिवंत होतील, असा हैराण करणारा दावाही या माता-पित्याने केला होता.

संबंधित बातम्या :

हाताचे चुंबन घेऊन उपचाराचा दावा, भोंदूबाबाचा कोरोनाने मृत्यू, 19 भक्तही पॉझिटिव्ह

देवाकडून कोरोनाची निर्मिती, मी विषाणूचा मानवी अवतार, दोन लेकींच्या हत्येनंतर महिलेचा विचित्र दावा

(Amravati Melghat Lady dies of COVID due to Superstition)