AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आधी काळी जादू केली, मग कुकर्म’ IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यासोबत नेमके काय घडले?

आयआयटी बॉम्बेमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्याची ग्रिंडर अॅपच्या माध्यमातून आरोपीशी दोन वर्षापूर्वी ओळख झाली होती. विद्यार्थ्याचा आरोप आहे की, आरोपीने त्याच्यासोबत हिंसक लैंगिक संबंध ठेवले.

'आधी काळी जादू केली, मग कुकर्म' IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यासोबत नेमके काय घडले?
आयआयटी विद्यार्थी मृत्यू प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडीImage Credit source: Google
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Feb 14, 2023 | 1:22 PM
Share

मुंबई : विद्यार्थ्याच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच आयआयटी बॉम्बेतून आज आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आयआयटी बॉम्बेच्या एका विद्यार्थ्याने मुंबईतील एका जोडप्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. अतिशय हाय प्रोफाईल सोसायटीत राहणारे पती-पत्नी ‘तांत्रिक लैंगिक संबंध‘ ठेवतात, असा या विद्यार्थ्याचा आरोप आहे. तसेच या जोडप्याने त्याला सेक्स स्लेव्ह बनवले आहे. तांत्रिक सेक्स दरम्यान हे जोडपे त्याला तासनतास लैंगिक कृत्यात गुंतवून ठेवतात आणि या दरम्यान त्याला बांधले जाते आणि त्यावर विविध ठिकाणी मेण वितळले जाते, असे विद्यार्थ्याने आपल्या आरोपात म्हटले आहे. याप्रकरणी पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अद्याप कुणालाही अटक नाही

मुंबई पोलिसांनी याप्रकरणी एक पुरुष आणि त्याच्या पत्नीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, अनैसर्गिक लैंगिक संबंध आणि जादूटोणा या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शनिवारी एफआयआर नोंदवला. याप्रकरणी दोन दिवस उलटून गेले तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

ग्रिंडर अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्याची आरोपीशी ओळख

आयआयटी बॉम्बेमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्याची ग्रिंडर अॅपच्या माध्यमातून आरोपीशी दोन वर्षापूर्वी ओळख झाली होती. विद्यार्थ्याचा आरोप आहे की, आरोपीने त्याच्यासोबत हिंसक लैंगिक संबंध ठेवले. संबंध ठेवताना इतका छळ केला की, त्यातून जीव जाण्याचा धोका होता.

जोडपे तांत्रिक संबंध ठेवत असल्याचा आरोप

हे जोडपे ‘तांत्रिक सेक्स’ करतात, असा तरुणाचा आरोप आहे. सेक्स करताना तरुणाचे हात बांधून त्याचा गळा दाबला होता. शरीरावर अनेक ठिकाणी गरम चटके देण्यात आले. पती-पत्नीने मिळून त्याला सेक्स स्लेव्ह बनवले आणि अनेक प्रकारे छळ करून त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवले.

हे प्रकरण हायप्रोफाईल जोडप्याशी संबंधित असल्याने त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. तांत्रिक सेक्समध्ये व्यक्तीला संमोहन करून गुलाम बनवले जाते. संमोहित झाल्यानंतर, संबंधित व्यक्ती त्याला सांगितल्याप्रमाणे करते आणि जो आदेश देणाऱ्याच्या स्वाधीन होतो.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच