AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

kalyan : आरपीएफच्या जवानाची सब इन्स्पेक्टरला लाकडी दांडक्याने मारहाण, कारण समजताच…

आरोपी पंकज यादव याला पेण येथून कोलशेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एका प्रकरणात पंकज यादव याची चौकशी करत कारवाई केल्याचा पंकजला राग आला होता.

kalyan : आरपीएफच्या जवानाची सब इन्स्पेक्टरला लाकडी दांडक्याने मारहाण, कारण समजताच...
kalyan kolsewadiImage Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 09, 2023 | 11:05 AM
Share

कल्याण : कल्याणमध्ये (kalyana East) एक दुर्देवी घटना घडली आहे, आरपीएफच्या सब इन्स्पेक्टरला (RPF Sub Inspector) जवानाने लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे. त्यामुळे आरपीएफ खात्यामध्ये सावळागोंधळ असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मारहाण इतक्या जोरात करण्यात आली की, सब इन्स्पेक्टरचा त्यामध्ये मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरपीएफचे जवान हादरुन गेले आहे. संबंधित जवानाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. कोळशेवाडी पोलीस ठाण्यात (Kolsewadi Police) गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित प्रकरणाची पोलिस कसून चौकशी करतील.

कल्याण पूर्वेत धक्कादायक प्रकार घडला आहे. रात्रीच्या सुमारास कल्याण आरपीएफच्या सब इन्स्पेक्टरची हत्या करण्यात आली. बसवराज गरग असे मयत सब इन्स्पेक्टरचे नाव असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्याचबरोबर शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

आरपीएफचा जवान पंकज यादव याने हत्या केली. कल्याण पूर्व सिद्धार्थ नगर येथील रेल्वे बॅरेक हा सगळा प्रकार घडला आहे. लाकडी दांडक्याने मारहाण करत हत्या केली आहे. हत्याकेल्या नंतर पंकज घटना स्थळावरुन पसार झाला होता. कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी पंकज यादव याला पेण येथून कोलशेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एका प्रकरणात पंकज यादव याची चौकशी करत कारवाई केल्याचा पंकजला राग आला होता. याचं रागातून काल रात्रीच्या सुमारास पंकजने बसवराज गरग यांची लाकडी दांडक्याने मारहाण करत हत्या केली.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.