
मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात दोन टोळ्या भिडल्याची माहिती समोर येत आहे. ऑर्थर रोड हा उच्च सुरक्षा असलेला तुरुंग आहे. ६ जुलै रोजी मुंबईच्या उच्च सुरक्षा असलेल्या सेंट्रल जेलमध्ये दोन गँग मध्ये मारामारी झाली. दोन टोळ्यातील काही जणांनी एकमेकांवर खुमखुमी काढली. त्यांच्यात चांगलीच मारामारी झाल्याचे समजते. 20 वर्षांपासून चीनमध्ये लपलेल्या गँगस्टरच्या गेल्यावर्षी मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. त्याच्यावरच हल्ला झाला. काय घडले तुरुंगात?
गँगस्टर प्रसाद पुजारीवर हल्ला
आर्थर रोड कारागृहात आरोपींमध्ये मारामारी झाली. गँगस्टर प्रसाद पुजारीवर हल्ला झाला. प्रसाद पुजारीसह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गँगस्टर प्रसाद पुजारीला गेल्या वर्षी चीनहून भारतात आणण्यात आले होते तेव्हापासून तो आर्थर रोड येथील उच्च सुरक्षा असलेल्या कारागृहात कैद आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १९४(२) अंतर्गत दंगा आणि मारहाणीच्या आरोपाखाली सात कैद्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सात जणांवर गुन्हा
प्रसाद पुजारी याच्याच सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात गँगस्टर प्रसाद पुजारीवर हल्ला झाला. पोलिसांनी प्रसाद पुजारीसह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अनेक वर्षांपासून फरार असलेल्या प्रसाद पुजारीला गेल्या वर्षी चीनमधून भारतात आणण्यात आले होते. सध्या पुजारी मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात कैद आहे. प्राप्त माहितीनुसार, ६ जुलै रोजी मुंबईच्या उच्च सुरक्षा असलेल्या मध्यवर्ती कारागृहात दोन टोळक्यांनी एकमेकांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. ही घटना 6 जुलै रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास घडली.
कोण आहेत आरोपी?
सूत्रांनी सांगितले की, या घटनेनंतर तुरुंग अधिकारी रवींद्र अर्जुन टोंगे यांनी एसओपी अंतर्गत एनएम जोशी पोलिस ठाण्यात तक्रार केली. जिथे तक्रारीच्या आधारे, ७ जुलै रोजी सात कैद्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता (बीएनएस) च्या कलम १९४ (२) अंतर्गत दंगल आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या ७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात इरफान रहीम खान, शुएब खान उर्फ भूरया, अयुब अनुमुद्दीन शेख, मुकेश सीताराम निषाद, लोकेंद्र उदय सिंग रावत, सिद्धेश संतोष भोसले आणि प्रसाद विठ्ठल पुजारी यांचा समावेश आहे.
कोणीही गंभीर जखमी नाही
एका अधिकाऱ्याने सांगितले की, तुरुंगातील या टोळीयुद्धात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. परंतु या घटनेनंतर तुरुंग प्रशासनाने उच्च सुरक्षा असलेल्या तुरुंगात अशी घटना कशी घडली याची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. . प्रसाद उर्फ सुभाष विठ्ठल पुजारी उर्फ सिद्धार्थ शेट्टी उर्फ सिद्धू उर्फ सिड उर्फ जॉनी याच्यावर हल्ला झाला. त्याचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. तो गेल्या २० वर्षांपासून त्याच्या पत्नीसह चीनमध्ये राहत होता. मार्च २०२४ मध्ये त्याला भारतात आणण्यात आले.