महाभयंकर विमान अपघातातून वाचला, पण रात्रीची झोपच उडाली, बोलणंही बंद, फक्त एकटक… अहमदाबाद दुर्घटनेतील विश्वास कुमार जिवंत असूनही…ती काय?
Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेतील एकमेव जिवंत व्यक्ती विश्वास कुमार हा सध्या अस्वस्थ आहे. बोईंग 787 ड्रीमलायनर विमान दुर्घटनेत 241 प्रवासी आणि 19 इतर लोकांचा मृत्यू झाला होता.

Vishwas Kumar : अहमदाबाद विमान दुर्घटनेची कारणं अद्यापही समोर आलेली नाहीत. त्यावर तर्क आणि अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 12 जून रोजी एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर जवळच एका होस्टेलवर कोसळले होते. या अपघातात विश्वार कुमार हा प्रवाशीच आश्चर्यकारकरित्या वाचला होता. तो या अपघातातील एकमेव जिवंत व्यक्ती आहे. पण तो सध्या अस्वस्थ आहे. बोईंग 787 ड्रीमलायनर विमान दुर्घटनेत 241 प्रवासी आणि 19 इतर लोकांचा मृत्यू झाला होता.
अजूनही सावरला नाही विश्वास कुमार
विश्वासच्या चुलत भावाने सांगितले की तो अजूनही या अपघातातून सावरलेला नाही. विमान अपघाताची ती घटना त्याला अस्वस्थ करत आहे. त्याला या अपघातातून वाचणे आणि भावाच्या मृत्यूने मोठा धक्का बसला आहे. तो ब्रिटिश नागरीक आहे. इंग्लंडमधून त्याला नातेवाईक दिवसभरात मोबाईलवर संपर्क साधतात. त्याची काळजी करतात. पण विश्वास त्यांच्याशी फोनवर फारसा बोलत नाही. तो अजून ही या अपघाताच्या धक्क्यातून सावरलेला नाही. भावाच्या मृत्यूने त्याला मोठा धक्का बसला आहे.
तो झोपेतच अचानक उठून बसतो. मग त्याचा डोळ्याला डोळा लागत नाही. त्याला सतत त्या घटनांची आठवण येते. त्याला विमान दुर्घटना विसरता येत नाही. तो एकटाच अंथरुणावर बसून असतो. त्यामुळे त्याला मानसोपचारतज्ज्ञाकडे नेण्यात आले. तिथेही त्याचावर उपचार सुरू आहेत. सध्या लंडनला परत जाण्याविषयी तो विचार करत नसल्याची माहिती समोर आली आहे. अजून विमान प्रवासाचे त्याचे धाडस होत नसल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
कुटुंबियांना भेटून जाणार होता परत
विश्वास याला 17 जून रोजी अहमदाबाद येथील सामान्य रुग्णालयातून सुट्टी मिळाली होती. त्याच दिवशी डीएनए चाचणीनंतर त्याच्या भावाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कुटुंबियांना देण्यात आला होता. विश्वास आणि त्याचा भाऊ अजय हे दोघेही दादरा आणि नगर हवेली आणि दीव-दमण या केंद्रशासित प्रदेशातील नातेवाईकांना भेटून पुन्हा लंडनला परत जाण्यासाठी अहमदाबाद येथे आले होते. पण विमानाने उड्डाण भरताच अवघ्या काही सेकंदात विमान रहिवासी भागावर कोसळले.
