AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पळण्याच्या आधीच तो सापळ्यात अडकला, तक्रारदाराची चलाखी त्याला कळलीच नाही, लाचखोर अधिकारी एसबीच्या जाळ्यात…

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील तालुका संघाची निवडणूक प्रक्रियेचे मुख्य निवडणूक अधिकारी असलेल्या सहाय्यक निबंधक असलेल्या अधिकाऱ्यालाच लाच घेतांना एसबीने रंगेहाथ अटक केली आहे.

पळण्याच्या आधीच तो सापळ्यात अडकला, तक्रारदाराची चलाखी त्याला कळलीच नाही, लाचखोर अधिकारी एसबीच्या जाळ्यात...
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Mar 03, 2023 | 8:38 AM
Share

नाशिक : नाशिकच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने ( ACB ) केलेल्या कारवाईने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सहकार विभागाच्या सहाय्यक निबंधकालाच लाच घेतांना रंगेहात पकडले आहे. गुरुवारी दुपारच्या वेळेला पंधरा हजार रुपयांची लाच ( Bribe ) घेतांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पतसंस्थेच्या थकीत कर्जदारांना 101 ची नोटीस देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. एकनाथ प्रताप पाटील असं लाचखोर सहाय्यक निबंधकाचे नाव आहे. नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईवरुन सहकार विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील एका पतसंस्थेत काही थकीत कर्जदार आहे. त्यांना कर्ज वसूली करिता नोटिस बजावली जाते. त्यासाठी 101 चे दाखले उपलब्ध करून घ्यावे लागतात. हे दाखले सहकार निबंधक देत असतात.

एकूण 17 प्रकरणे असल्याने पतसंस्थेकडे दीड हजार रुपये प्रमाणे लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यामध्ये थकीत कर्जदार यांना 101 प्रमाणे नोटिस दिली जाणार होती. असे एकूण साडे पंचवीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती.

या संपूर्ण प्रकरणी तक्रारदार यांनी नाशिकच्या एसीबी कार्यालयाशी संपर्क साधला. संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आणि त्यानुसार एसीबीच्या पथकाने सिन्नर सहकार कार्यालयात सापळा रचला होता.

एकनाथ प्रताप पाटील यांच्या कार्यालयात साडेपंचवीस हजारापैकी पंधरा हजार देत असतांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. एसीबीचा सापळा यावेळी यशस्वी झाला असून सहकार क्षेत्रात या कारवाईने खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे ही संपूर्ण कारवाई निवडणुकीच्या धामधुमीत करण्यात आली आहे. सिन्नर तालुका खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. त्याचे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्यांना अटक करण्यात आली तेच मुख्य निवडूक अधिकारी आहे.

Follow Us
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
Shivsena Hearing : सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28 वा मुद्दा सर्वात खास
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि... गुणरत्न सदावर्तेंची पत्रकार परिषद ऐकाच!
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर... सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर सुळे संतापल्या
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार अन्...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा खुलासा; कुटुंबाकडून हादरवणारी माहिती समोर
महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
बुलढाण्यात राजकीय वाद विकोपाला; महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच...
चालता येईना... जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच आला समोर
कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या पक्षाची काँग्रेस... कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला: अमित ठाकरेंच्या निषेधार्थ सभा तहकूब
नंबर प्लेटबाबत विचारताच आमदाराची अरेरावी, चक्क शिवगाळ करत...खळबळजनक...
नंबर प्लेटबाबत विचारताच आमदाराची अरेरावी, चक्क शिवगाळ करत... खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल!