तरुणीच्या गळ्यात त्यानं आधी हात घातला, मग चाकूनं वार! बारामतीमधील थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड

तरुणीच्या गळ्यात त्यानं आधी हात घातला, मग चाकूनं वार! बारामतीमधील थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड
बारामतीत तरुणीवर चाकू हल्ला

आरडाओरडा आणि गोंधळ झाल्याचं समजताच शेजारी काही युवकही बाहेर झाले. नेमकं काय झालंय, हे कळायच्या आतच तरुणानं पळ काढला होता.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 18, 2022 | 4:58 PM

बारामती : बारामती (Baramati) शहरात एका तरुणीवर जीवघेणा हल्ला (Attack on girl) करण्यात आला. हा हल्ला फसल्यानंतर हल्लेखोर तरुणानं पळ काढला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली असून आता हल्लेखोर तरुणाविरोधात पोलिस तक्रारही दाखल करण्यात आली आहे. पोलीस सध्या हल्ला केलेल्या फरार तरुणाचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीनं शोध घेत आहेत. बारामती शहरातील पूर्वा कॉर्नर कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली आहे. या कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या केसरी टुर्सच्या ऑफिसमध्ये पर्यटनाचं बुकिंग करण्याऱ्या तरुणीवर हल्ला करण्यात आला. दरम्यान, हल्ला करण्याआधी चोर पावलांनी ऑफिसमध्ये घुसतानाचा तरुणाचा वावर स्पष्टपणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ऑफिसच्या बाहेर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली. हल्ला केल्यानंतर तरुण पसार झाला. यानंतर युवतीही त्याच्या मागे धावली. मात्र तोपर्यंत हल्लेखोर तरुणानं पलायन केलं होतं.

वाद काय झाला?

बारामतीसमध्ये मंगळवारी सकाळी पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडली. बारामती शहरातील केसरीच्या रजत टूर्सचे ऑफिस उघडल्यानंतर संशयित आरोपी असलेला तरुण ऑफिसमध्ये आला. ‘मी काल आपल्या ऑफिसला येऊन गेलो. परंतु आपण काल ऑफिस लवकर बंद केलं’ असं म्हणत या आरोपीने महिलेच्या गळ्यात हात घातला. दचकलेल्या महिलेने आपली सोन्याची चेन चोरतोय की काय? या शंकेनं त्या आरोपीचा हात धरला.

नंतर या आरोपीने ‘माझा हात सोड’ असे म्हणून त्याने हातावर चाकूचा वार केला आणि तो पळून गेला. यानंतर ऑफिसमधून महिलेनं हल्लेखोर तरुणाचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला. परंतु तो आपली चप्पल न घालताच गाडीवर बसून पसार झाला. आरडाओरडा आणि गोंधळ झाल्याचं समजताच शेजारी काही युवकही बाहेर झाले. नेमकं काय झालंय, हे कळायच्या आतच तरुणानं पळ काढला होता. दरम्यान, ऑफिसमध्ये शिरण्याआधी दबक्या पावलांनी चप्पल काढून तरुण प्रवेश करत असल्याचंही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

चाकू लागल्याने या महिलेच्या हाताला जखम झाली आहे. मात्र मोठा अनर्थ तरुणीनं प्रसंगावधान राखल्यामुळे टळलाय.  याप्रकरणी बारामती शहर पोलिस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज काढून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथकंदेखील रवाना केली आहेत.

संबंधित बातम्या :

Pune Crime | तू माझ्यावर प्रेम नाही केलं तर … म्हणत अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

लिफ्ट देण्याचा बहाणा! ट्रकमध्ये बसवून आळीपाळीनं बलात्कार, नंतर प्रेत नदीत फेकलं


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें