लिफ्ट देण्याचा बहाणा! ट्रकमध्ये बसवून आळीपाळीनं बलात्कार, नंतर प्रेत नदीत फेकलं

लिफ्ट देण्याचा बहाणा! ट्रकमध्ये बसवून आळीपाळीनं बलात्कार, नंतर प्रेत नदीत फेकलं
प्रातिनिधीक फोटो

धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी घरी जाऊन आपल्यासोबत काय घडलं हे सांगेल, याच्या भीतीनं तिघांनीहीह या मुलीची गळा दाबून हत्या केली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 18, 2022 | 3:33 PM

मध्य प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. या बलात्कारानंतर मुलगी आपल्यासोबत झालेला प्रकार घरी जाऊन सांगेल, म्हणून तिची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. तिघांनी एका 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला आणि यानंतर तिचं प्रेत नदीत फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. 27 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेबाबत आता धक्कादायक बाबी समोर आल्या असून ही घटना मध्य प्रदेशात घडल्याचं वृत्त आजतकनं दिलं आहे. या घटनेमुळे देशातील मुलींच्या (Girls Safety) सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं अधोरेखित झालंय. लिफ्ट देण्याचा बहाणा करत ट्रकमध्ये बसवून अल्वयीनं मुलीवर आळीपाळीनं बलात्कार झाल्याची घडना उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय झालं?

मध्य प्रदेशातील ग्वालिअर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांनी अतिप्रसंग करत तिचा आळीपाळीनं बलात्कार केला. रविवारी या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असल्याचं पोलीस अधीक्षक अमित सांघी यांनी म्हटलंय. तीन आरोपींपैकी दोघे जण ट्रक ड्रायव्हर असून ट्रक चालकांनी अल्पवयीन मुलीला उत्तर प्रदेशात घेऊन जाण्यासाठी लिफ्ट देण्याचा बहाणा केला होता. यानंतर वाटेत अल्पवयीन मुलीचा शेजारी आणि दोघा ट्रक चालकांनी आळीपाळीनं तिच्यावर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी घरी जाऊन आपल्यासोबत काय घडलं हे सांगेल, याच्या भीतीनं तिघांनीहीह या मुलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर या मुलीचं प्रेत हे नदीत फेकून दिलं. भिंड जिल्ह्यातील चिंबल नदीत या मुलीचं प्रेत फेकून देण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी तपास करत ही माहिती समोर आली आहे, ती सगळ्यांनाच हादरवणारी आहे.

बलात्कार करुन फरार, पॉर्नफिल्म बघतानाच बेड्या

दिल्लीतील अलीपूरमध्येही आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या मुलीच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करताच पोलिसांनी संशयितांनी अटक केली असून ज्या वेळी पोलिसांनी आरोपीला पकडलं तेव्हा संशयित आरोपी मोबाईवर पॉर्नफिल्म पाहत होता. दरम्यान, याचवेळी पोलिसांनी रंगेहाथ आरोपीला बेड्या ठोकल्यात.

शनिवारी पीडित मुलगी आपल्या बहिणीसोबत मंदिरात गेली होती. यावेळी नराधम आरोपी तिला बहाणा करत जंगलात घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केल्याची बाबही उघडकीस आली. बलात्कार करुन फरारा झालेल्या नराधमाला पोलिसांनी अखेर गजाआड केलंय.

संबंधित बातम्या :

वहिनी आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट, ब्लॅकमेल करत पुण्यात दिराकडून बलात्कार

70 वर्षाची आजी म्हणतेय 85  वर्षाच्या प्रियकराची डीएनए टेस्ट करा , भानगड काय आहे?

साखरपुड्यानंतरही गर्लफ्रेण्डशी संबंध, बापाकडून पोराची हत्या, बहीण-आईच्या मदतीने मृतदेह नदीत फेकला


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें