साखरपुड्यानंतरही गर्लफ्रेण्डशी संबंध, बापाकडून पोराची हत्या, बहीण-आईच्या मदतीने मृतदेह नदीत फेकला

साखरपुड्यानंतरही गर्लफ्रेण्डशी संबंध, बापाकडून पोराची हत्या, बहीण-आईच्या मदतीने मृतदेह नदीत फेकला
प्रातिनिधिक फोटो

पाच जानेवारीला रुपरेल नदीत रामकृष्ण नावाच्या तरुणाचा मृतदेह सापडला होता. मृतदेहाचे हात-पाय दोरीने बांधलेले होते. मृताचा त्याच्या कुटुंबीयांशी वाद झाल्याचे तपासात समोर आले आहे. अधिक तपास केला असता, मृताच्या घरी हाच दोर सापडला, जो मृतदेहाच्या हातपायांमध्ये बांधलेला होता.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jan 18, 2022 | 9:56 AM


भोपाळ : मध्य प्रदेशातील बुरहानपूरमध्ये बापाने आपल्या मुलाची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यानंतर पत्नी आणि मुलीसह त्यांनी लेकाच्या मृतदेहाचीही विल्हेवाट लावली. साखरपुडा झाल्यानंतरही मुलगा गर्लफ्रेण्डसोबत चॅटिंग करत असल्याच्या रागातून पित्याने त्याचा जीव घेतल्याचा आरोप आहे. बापाने ढकलल्यानंतर बाथरुमच्या भिंतीवर डोकं आपटल्यामुळे पोरगा बेशुद्ध पडला होता. त्यानंतर हैवान पित्याने त्याच्या छातीत लाथ मारुन त्याचा जीव घेतला. हत्येनंतर कुटुंबीयांनी मुलाचा मृतदेह नदीत फेकून दिला होता. 15 दिवसांनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केला आहे. पोलिसांनी केवळ एका दोरीच्या सहाय्याने या प्रकरणाची उकल केली. मृतदेहाचे हातपाय बांधेलल्या दोरीचा भाग आरोपींच्या घरी सापडल्यामुळे हत्येचं गूढ उकललं.

काय आहे प्रकरण?

बुरहानपूरचे एसपी राहुल कुमार लोढा यांनी सांगितले की, ही घटना निबोला पोलिस स्टेशन क्षेत्रातील धुलकोट गावातील आहे. पाच जानेवारीला रुपरेल नदीत रामकृष्ण नावाच्या तरुणाचा मृतदेह सापडला होता. मृतदेहाचे हात-पाय दोरीने बांधलेले होते. मृताचा त्याच्या कुटुंबीयांशी वाद झाल्याचे तपासात समोर आले आहे. अधिक तपास केला असता, मृताच्या घरी हाच दोर सापडला, जो मृतदेहाच्या हातपायांमध्ये बांधलेला होता. या आधारे रामकृष्णचे वडील, आई आणि बहिणीची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी हत्येची कबुली दिली.

साखरपुड्यानंतरही गर्लफ्रेण्डसोबत गप्पा

रामकृष्णच्या आई, वडील आणि बहिणीने सांगितले की, त्याचा साखरपुडा झाला होता. असं असूनही तो दिवसभर दुसऱ्या मुलीशी बोलत असे. 2 जानेवारीच्या रात्री दहा वाजताच्या सुमारास रामकृष्ण तरुणीशी फोनवर बोलत होता. त्यामुळे त्याचे वडील भीमन सिंह संतापले आणि त्यांनी रामकृष्णवर आरडाओरड केली. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्याने रामकृष्णच्या कानशिलात लगावली आणि ढकलून दिले. धक्का दिल्यामुळे रामकृष्ण बाथरुमच्या भिंतीला धडकून जमिनीवर पडला.

रामकृष्णचे वडील इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांच्या मस्तकात इतका संताप होता, की त्यांनी रामकृष्णच्या छातीवर जोरदार लाथ मारली. रामकृष्णा कोणतीही हालचाल करत नव्हता. त्यामुळे वडिलांनी घाबरून त्याचे हात पाय दोरीने बांधले. यानंतर वडील, आई जमनाबाई आणि बहीण कृष्णाबाई यांनी मिळून त्याचा मृतदेह रुपरेल नदीत फेकून दिला. आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची रवानगी तुरुंगात केली.

संबंधित बातम्या :

झोमॅटो डिलिव्हरी बॉयची भररस्त्यात हत्या, फूड पार्सल पोहोचवायला जाताना खून

मेहुणीला लग्नाचं वचन, बायकोचा मर्डर, महिला पोलिसांशी अनैतिक संबंध, स्त्रीलंपट नवऱ्याला अटक

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें