AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वहिनी आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट, ब्लॅकमेल करत पुण्यात दिराकडून बलात्कार

सावत्र दिराने आधी महिला आंघोळ करत असताना लपून छपून तिचा व्हिडीओ शूट केल्याचा आरोप आहे. त्यानंतर हा अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने वहिनीला मारहाण केल्याचंही समोर आलं आहे.

वहिनी आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट, ब्लॅकमेल करत पुण्यात दिराकडून बलात्कार
लग्नाचे रिसेप्शन, वऱ्हाड्यांचा डीजेवर ताल, अचानक तरुण कोसळला
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jan 18, 2022 | 1:02 PM
Share

पिंपरी चिंचवड : दिराने वहिनी आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट (Bathing Video) करुन तिच्यासोबत बळजबरी केली. पुणे जिल्ह्यातील हिंजवडी परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी तरुण हा विवाहितेच्या पतीचा सावत्र भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. सावत्र दिराने आधी महिला आंघोळ करत असताना लपून छपून तिचा व्हिडीओ शूट केल्याचा आरोप आहे. त्यानंतर हा अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने वहिनीला मारहाण केल्याचंही समोर आलं आहे. त्याचप्रमाणे दिराने वहिनीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी सावत्र दिरावर हिंजवडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा (Rape) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2021 मध्ये घडला होता.

काय आहे प्रकरण?

25 वर्षीय पीडित विवाहित महिलेने या प्रकरणी शनिवारी (15 जानेवारी) पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित महिलेचा सावत्र दीर आहे. ती आंघोळ करतानाचे व्हिडीओ दिराने चित्रिकरण केले. अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आरोपी वहिनीला गदेत होता. तसेच तिच्या घरी जाऊन दिराने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर तिच्याशी जबरदस्ती करुन शारीरिक सबंध ठेवल्याचा आरोप आहे.

बदनामीच्या भीतीने तक्रार टाळली

हा प्रकार 16 डिसेंबर 2021 रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडला होता. महिलेने लाज-लज्जेखातर आणि समाजात बदनामीच्या भीतीने तक्रार दिली नाही. मात्र आरोपीचा त्रास वाढल्याने अखेर तिने पतीसह पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या :

बायको आंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर, मुंबईत 30 वर्षीय नवऱ्याला अटक

पंढरपूरमध्ये ‘मिर्झापूर’, माझ्या मुलामुळे दिवस जात नाहीत, तर माझ्याशी संबंध ठेव, सासऱ्याची सुनेवर बळजबरी

आंघोळ करताना महिला पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ, पोलीस कॉन्स्टेबलकडून ब्लॅकमेलिंग

Follow Us
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...