AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंघोळ करताना महिला पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ, पोलीस कॉन्स्टेबलकडून ब्लॅकमेलिंग

भोपाळ पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका पोलीस कॉन्स्टेबलच्या विरोधात एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा आंघोळ करताना व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

आंघोळ करताना महिला पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ, पोलीस कॉन्स्टेबलकडून ब्लॅकमेलिंग
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 29, 2021 | 2:59 PM
Share

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये आंघोळ करताना महिला पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ बनवल्याचे प्रकरण समोर आले आहे. महिला पोलीस अधिकाऱ्याच्या ड्रायव्हरनेच हा व्हिडीओ बनवल्याचा आरोप आहे. भोपाळ पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपी पोलीस कॉन्स्टेबलच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता त्याच्या शोधासाठी छापे टाकले जात आहेत.

काय आहे प्रकरण?

भोपाळ पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका पोलीस कॉन्स्टेबलच्या विरोधात एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा आंघोळ करताना व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपी कॉन्स्टेबलचे नाव भूपेंद्र सिंह असे आहे. तो तक्रारदार महिला पोलीस अधिकाऱ्याचा वाहन चालक म्हणून तैनात होता.

बाथरुमच्या दाराखाली मोबाईल कॅमेरा

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला अधिकाऱ्याने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, 22 सप्टेंबरला ती आंघोळ करत असताना कोणीतरी तिचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तिला समजले. पीडित महिला अधिकाऱ्याने तिच्या बाथरुमच्या दाराखाली मोबाईल कॅमेरा पाहिला. त्या बाहेर येताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.

पोलीस कॉन्स्टेबलकडून पैशांची मागणी

महिला अधिकाऱ्याने आरोप केला की, 26 सप्टेंबर रोजी चालक तिच्या घरी आला आणि तिच्याकडून 5 लाख रुपयांची मागणी केली आणि तसे न केल्यास तिला सोशल मीडियावर बदनाम करण्याची धमकी दिली. महिला अधिकाऱ्याने सुरुवातीला एसपी मुख्यालयाशी संपर्क साधला, ज्यांनी शहराच्या गुन्हे शाखेला प्राथमिक तपासात सहभागी करुन घेतले.

आरोपी पसार, शोध सुरु

आरोपी पोलिस कॉन्स्टेबलवर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली आणि आयटी कायद्याच्या अनेक कलमांखाली ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार आहे. त्याने गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.

नागपुरातही बाथ व्हिडीओ 

दरम्यान, तरुणीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट केल्याचा धक्कादायक प्रकार याआधी नागपुरात उघडकीस आला होता. अल्पवयीन शेजाऱ्याने हा प्रताप केला होता. पोलिसांनी समज देऊन अल्पवयीन मुलाला पालकांच्या ताब्यात दिलं होतं. नागपूरमधील तहसील पोलीस स्टेशन हद्दीत ही खळबळजनक घटना घडली होती.

बाथ व्हिडीओचे स्क्रीनशॅाट व्हायरल

अल्पवयीन शेजाऱ्याने तरुणीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट केला होता. या आक्षेपार्ह व्हिडीओतील काही स्क्रीनशॅाट म्हणजेच फोटो काढून त्याने सोशल मीडियावर व्हायरल केले होते. हा प्रकार समजल्यानंतर तरुणीला धक्काच बसला. तिने पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली. नागपूरमधील तहसील पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी 17 वर्षांचा असल्यामुळे पोलिसांकडून सूचनापत्र देऊन त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

निर्जन रस्त्यावर अश्लील चाळे

दरम्यान, नागपूरमधील जरीपटका भागातून पायी घरी जाणाऱ्या महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून तिच्याशी अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला गेल्याच महिन्यात अटक करण्यात आली. यावेळी आरोपी सुरजने पादचारी महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. आजूबाजूला कुणी नसल्याचे पाहून त्याने तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. महिलेने आरडाओरड केल्यामुळे तो पळून गेला.

संबंधित बातम्या :

तरुणी आंघोळ करताना व्हिडीओ शूट, धमकावून अपहरण करत अत्याचार, नागपुरातील प्रकार

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेशी अश्लील चाळे, इंजिनिअरिंग विद्यार्थ्याला अटक

तरुणी आंघोळ करताना व्हिडीओ शूट, स्क्रीनशॉट व्हायरल, नागपुरात अल्पवयीन शेजाऱ्याचा प्रताप

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ