तरुणी आंघोळ करताना व्हिडीओ शूट, स्क्रीनशॉट व्हायरल, नागपुरात अल्पवयीन शेजाऱ्याचा प्रताप

नागपुरात राहणाऱ्या अल्पवयीन शेजाऱ्याने संबंधित तरुणीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट केला होता. त्यानंतर यातील फोटो त्याने सोशल मीडियावर व्हायरल केले

तरुणी आंघोळ करताना व्हिडीओ शूट, स्क्रीनशॉट व्हायरल, नागपुरात अल्पवयीन शेजाऱ्याचा प्रताप
प्रातिनिधीक फोटो
सुनील ढगे

| Edited By: अनिश बेंद्रे

Jun 16, 2021 | 10:42 AM

नागपूर : तरुणीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. अल्पवयीन शेजाऱ्याने हा प्रताप केला. अखेर पोलिसांना समज देऊन अल्पवयीन मुलाला पालकांच्या ताब्यात दिलं. नागपूरमधील तहसील पोलीस स्टेशन हद्दीत ही खळबळजनक घटना घडली (Nagpur Minor boy shoots Objectionable Video of Neighbor Girl Bathing)

बाथ व्हिडीओचे स्क्रीनशॅाट व्हायरल

अल्पवयीन शेजाऱ्याने तरुणीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट केला होता. या आक्षेपार्ह व्हिडीओतील काही स्क्रीनशॅाट म्हणजेच फोटो काढून त्याने सोशल मीडियावर व्हायरल केले होते. हा प्रकार समजल्यानंतर तरुणीला धक्काच बसला. तिने पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली.

समज देऊन मुलाला सोडलं

नागपूरमधील तहसील पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी 17 वर्षांचा असल्यामुळे पोलिसांकडून सूचनापत्र देऊन त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

निर्जन रस्त्यावर अश्लील चाळे

दरम्यान, नागपूरमधील जरीपटका भागातून पायी घरी जाणाऱ्या महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून तिच्याशी अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला गेल्याच महिन्यात अटक करण्यात आली. यावेळी आरोपी सुरजने पादचारी महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. आजूबाजूला कुणी नसल्याचे पाहून त्याने तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. महिलेने आरडाओरड केल्यामुळे तो पळून गेला.

अश्लील व्हिडीओ प्रकरणाची पुनरावृत्ती 

दुसरीकडे, नागपुरात डिसेंबर 2018 मध्येही अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. पतीच्या नेहमीच्या जाचाला कंटाळून पीडितेने आपल्या माहेरी जाण्याची गोष्ट केली होती. परंतु, पतीने नकार दिला. काही दिवसांनी जेव्हा पती कामानिमित्त नागपूरला गेला, तेव्हा पत्नीने पळ काढून माहेर गाठलं. पण पत्नी माहेरी गेल्याची बाब आरोपी पतीला खटकली आणि त्याने पत्नीची बदनामी करत तिचा अश्लील व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केला होता. त्यानंतर पतीला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.

संबंधित बातम्या :

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेशी अश्लील चाळे, इंजिनिअरिंग विद्यार्थ्याला अटक

पत्नीशी पटेना, नवऱ्याने फेसबुकवर तिचाच अश्लील व्हिडीओ टाकला

परदेशी तरुणीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल, मुंबईत अभिनेत्याला अटक

(Nagpur Minor boy shoots Objectionable Video of Neighbor Girl Bathing)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें