तरुणी आंघोळ करताना व्हिडीओ शूट, धमकावून अपहरण करत अत्याचार, नागपुरातील प्रकार

आरोपींनी तरुणीचे अपहरण केल्यानंतर तिचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे तीन लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र एवढी रक्कम देण्यास असमर्थता दशवल्यानंतर टप्याटप्याने पैसे देण्यास सांगण्यात आले होते.

तरुणी आंघोळ करताना व्हिडीओ शूट, धमकावून अपहरण करत अत्याचार, नागपुरातील प्रकार
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 2:53 PM

नागपूर : तरुणी आंघोळ करत असतानाचा व्हिडीओ चित्रित करुन आधी तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. नागपुरात उघडकीस आलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी हा तरुणीच्या नाते संबंधातील असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

आरोपींनी तरुणीचे अपहरण केल्यानंतर तिचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे तीन लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र एवढी रक्कम देण्यास असमर्थता दशवल्यानंतर टप्याटप्याने पैसे देण्यास सांगण्यात आले होते. अपहरण केले असताना तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचाही आरोप केला जात आहे.

नागपूर शहरातील मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. या प्रकरणात तीन आरोपींचा सहभाग असून पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. त्यापैकी एक आरोपी हा तरुणीच्या नाते संबंधातील असल्याची माहिती समोर आली आहे.

नागपुरात बाथ व्हिडीओ प्रकरणाची पुनरावृत्ती

दरम्यान, तरुणीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट केल्याचा धक्कादायक प्रकार याआधीही नागपुरात उघडकीस आला होता. अल्पवयीन शेजाऱ्याने हा प्रताप केला होता. पोलिसांनी समज देऊन अल्पवयीन मुलाला पालकांच्या ताब्यात दिलं होतं. नागपूरमधील तहसील पोलीस स्टेशन हद्दीत ही खळबळजनक घटना घडली होती.

बाथ व्हिडीओचे स्क्रीनशॅाट व्हायरल

अल्पवयीन शेजाऱ्याने तरुणीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट केला होता. या आक्षेपार्ह व्हिडीओतील काही स्क्रीनशॅाट म्हणजेच फोटो काढून त्याने सोशल मीडियावर व्हायरल केले होते. हा प्रकार समजल्यानंतर तरुणीला धक्काच बसला. तिने पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली. नागपूरमधील तहसील पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी 17 वर्षांचा असल्यामुळे पोलिसांकडून सूचनापत्र देऊन त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

निर्जन रस्त्यावर अश्लील चाळे

दरम्यान, नागपूरमधील जरीपटका भागातून पायी घरी जाणाऱ्या महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून तिच्याशी अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला गेल्याच महिन्यात अटक करण्यात आली. यावेळी आरोपी सुरजने पादचारी महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. आजूबाजूला कुणी नसल्याचे पाहून त्याने तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. महिलेने आरडाओरड केल्यामुळे तो पळून गेला.

अश्लील व्हिडीओ प्रकरणाची पुनरावृत्ती 

दुसरीकडे, नागपुरात डिसेंबर 2018 मध्येही अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. पतीच्या नेहमीच्या जाचाला कंटाळून पीडितेने आपल्या माहेरी जाण्याची गोष्ट केली होती. परंतु, पतीने नकार दिला. काही दिवसांनी जेव्हा पती कामानिमित्त नागपूरला गेला, तेव्हा पत्नीने पळ काढून माहेर गाठलं. पण पत्नी माहेरी गेल्याची बाब आरोपी पतीला खटकली आणि त्याने पत्नीची बदनामी करत तिचा अश्लील व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केला होता. त्यानंतर पतीला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.

संबंधित बातम्या :

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेशी अश्लील चाळे, इंजिनिअरिंग विद्यार्थ्याला अटक

तरुणी आंघोळ करताना व्हिडीओ शूट, स्क्रीनशॉट व्हायरल, नागपुरात अल्पवयीन शेजाऱ्याचा प्रताप

'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.