पंढरपूरमध्ये ‘मिर्झापूर’, माझ्या मुलामुळे दिवस जात नाहीत, तर माझ्याशी संबंध ठेव, सासऱ्याची सुनेवर बळजबरी

पंढरपूरमध्ये 'मिर्झापूर', माझ्या मुलामुळे दिवस जात नाहीत, तर माझ्याशी संबंध ठेव, सासऱ्याची सुनेवर बळजबरी
पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन

पीडित महिलेच्या सासऱ्याने ती घरात एकटी असताना बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने आरडाओरड केल्यानंतर तिला सोडून दिले. नंतर सासऱ्याने सून बाथरुममध्ये आंघोळ करत असताना तिचे व्हिडीओ शूटिंग केले.

रवी लव्हेकर

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 28, 2021 | 2:53 PM

पंढरपूर : “तुला माझ्या मुलापासून अपत्य होत नाही, तू माझ्याशी संबंध ठेव” असं म्हणत सासऱ्यानेच सुनेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मिर्झापूर या वेब सीरिजमधील कथानकाशी साधर्म्य असलेला हा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरात उघडकीस आला आहे, संबंध न ठेवल्यास आंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकीही सासऱ्याने सुनेला दिली होती. या प्रकरणी वृद्धाच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

पंढरपूरच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या पीडित महिलेच्या सासऱ्याने ती घरात एकटी असताना बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने आरडाओरड केल्यानंतर तिला सोडून दिले. 20 डिसेंबर रोजी सासऱ्याने सून बाथरुममध्ये आंघोळ करत असताना तिचे व्हिडीओ शूटिंग केले.

आंघोळीचे व्हिडीओ काढून ब्लॅकमेल

व्हिडीओ क्लीपच्या आधारे सासऱ्याने सुनेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. तुला माझ्या मुलापासून अपत्य होत नाही, तू माझ्याशी संबंध ठेव, असे म्हणून सासऱ्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. नाहीतर तुझा आंघोळ करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी दिली.

सासऱ्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा

याबाबत पीडित महिला मंगळवेढा येथे माहेरी गेल्यानंतर तिच्या आई-वडिलांना हकिगत सांगितली. पीडित महिलेच्या आई-वडिलांनी पंढरपूर येथे ग्रामीण पोलीस ठाण्यात सासऱ्याच्या विरोधात विनयभंग, अत्याचार याबाबत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सासऱ्याला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.

संबंधित बातम्या :

शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची मर्सिडीज उलटली, मुलगा जखमी, कल्याण-शीळ रस्त्यावर विचित्र अपघात

माझ्या बायकोचा नवरा! पहिल्या पत्नीचा मृत्यू, दुसरीचा जीव प्रियकरात अडकला, नवऱ्याने काय केलं बघा

संसार उमलण्याआधीच गालबोट, सासरी जाताना गळ्यात मांजा अडकला, नवविवाहित तरुणाचा मृत्यू

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें