Pune Crime | तू माझ्यावर प्रेम नाही केलं तर … म्हणत अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

आरोपी मल्लेशने मुलीला लग्नाचे आमिष दाखवत वडगाव शेरी परिसरातील मोकळ्या रूम नेले. तिथे गेल्यानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीला माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू जर माझ्यावर प्रेम नाही केले, तर मी आत्महत्या करेन अशी बतावणी तरुणाने मुलीकडे केली.

Pune Crime | तू माझ्यावर प्रेम नाही केलं तर ... म्हणत अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार
minor girl

पुणे – तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्या लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडगाव शेरी येथील महिलेने चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी मल्लेश विठ्ठल कांबळे (19) थिटेवस्ती , खराडी येथील तरुणावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेने आपली 13 वर्षांची मुलगी घरातून गेलेली परतलीच नाही. तिला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार 21 नोव्हेंबर रोजी दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी आयपीसी कमल363 गुन्हा दाखल करत शोध घेण्यास सुरुवात केली. तपास करत असताना पोलिसांनी मुलीला फिर्यादीच्या ओळखीतील मुलाने पळवून नेल्याची माहिती मिळाली.

माझे तुझ्यावर प्रेम   आरोपी मल्लेशने मुलीला लग्नाचे आमिष दाखवत वडगाव शेरी परिसरातील मोकळ्या रूम नेले. तिथे गेल्यानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीला माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू जर माझ्यावर प्रेम नाही केले, तर मी आत्महत्या करेन अशी बतावणी तरुणाने मुलीकडे केली. त्यानंतर जबरदस्तीने तिच्यासोबत मुली सोबत लैंगिक संबंध ठेवले. याप्रकरणी पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत मल्लेश कांबळे याला अटक केली आहे.

22 मोबाईल हॅण्डसेटसह एक अटकेत दुसरीकडे घराचा दरवाजा उघडा दिसताच घरात घुसून मोबाईल फोन , पैसे चोरणाऱ्या एकाला पुणे पोलिसांनी जेरबंद केल आहे. मुरली नागराज असे टाका करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, आरोपीकडून पोलिसांनी तब्बल 22 मोबाईल हँडसेट जप्त केले आहे. शहरातील विविध भागात आरोपीने चोरी केल्याचं उघड झालं आहे.

दूध, वर्तमानपत्र आणायला घरातील लोक बाहेर पडले की तत्परतेने डाव साधत घरात घुसून मोबाईलची तसेच पैश्यांची चोरी करायचा. कुणालाही कळायच्या आतमध्ये तो घरातून पसार व्हायचा. मात्र एके ठिकाणी चोरी करून बाहेरपडताना सीसीटीव्हीही कॅमेऱ्यात आला आणि तिथे अडकला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं चोराची ओळख पटवत त्याचा शोध घेत अटक केली.

संबंधित बातम्या:

मुंब्रा पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 16 लाखाच्या अमली पदार्थांसह 4 आरोपींना बेड्या

घरचं झालं थोडं…म्हणे विनाहेल्मेट दुचाकीचालकांची 10 गुणांची परीक्षा; नाशिक पोलिसांचा निर्णय

एकविरेच्या दर्शनाहून परतताना भीषण अपघात, तिघा भाविकांचा मृत्यू, चिमुकल्यांसह 9 जण गंभीर

Published On - 4:05 pm, Mon, 22 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI