पब्जी गेमच्या माध्यमातून ओळख, मग भेटायला बोलावून पळवून नेण्याचा प्रयत्न, पण…

| Updated on: Jun 17, 2023 | 12:45 PM

सोशल मीडिया आणि ऑनलाईन गेममुळे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना सध्या उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पब्जी गेमच्या माध्यमातून ओळख, मग भेटायला बोलावून पळवून नेण्याचा प्रयत्न, पण...
नगरमध्ये तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न
Image Credit source: TV9
Follow us on

अहमदनगर : सोशल मीडियावरील ओळख एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. सोशल मीडियावरील मित्राने भेटायला बोलावून तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना संगमनेर शहरात घडली आहे. तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. तरुणीच्या फिर्यादीवरून बिहारमधील दोघांना अटक केली. सोशल मिडियातून तरुणीची आरोपींशी ओळख झाली होती. आज दुपारी आरोपींना न्यायालयात हजर करणार आहेत. अकरम शेख आणि नेमतुल्ला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
लव्ह जिहाद आणि धर्मांतरचा प्रकार असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप केला आहे.

पब्जी गेमच्या माध्यमातून ओळख

पीडित मुलीची 2 वर्षांपूर्वी पब्जी गेमच्या माध्यमातून आरोपींशी ओळख झाली होती. त्यानंतर आरोपी आणि तरुणी सातत्याने सोशळ मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आहेत. दोन वर्षानंतर काल 16 जून रोजी त्यांचे भेटायचे ठरले. त्यानुसार दोघे आरोपी बिहारमधून संगमनेरला तरुणीला भेटण्यासाठी आले. आरोपीने तरुणीला मालपाणी रिसॉर्ट येथे भेटायला बोलावले.

भेटायला बोलावले अन् पळवून नेण्याचा प्रयत्न

तरुणी रिसॉर्टवर भेटायला गेल्यानंतर आरोपी अकरमने तिच्याकडे एकांतात बसून बोलण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार ते दोघे कासार दुमला रोडकडे घेऊन गेला. यावेळी अकरमने तरुणीला लग्नासाठी प्रपोज केले, मात्र तरुणीने त्यास साफ नकार दिला. यानंतर अकरमने तिला बळजबरीने ओढत नेऊ लागला. तसेच त्याचा मित्र नेमतुल्ला याने घरी येऊन तुझे आणि अकरमचे प्रेमसंबंध असल्याचे सांगण्याची तिला धमकी दिली.

हे सुद्धा वाचा

जागरुक नागरिकांमुळे तरुणीची सुटका

यावेळी तरुणीने आरडाओरडा सुरु केला. तरुणीचा आरडाओरडा ऐकून तेथे तीन ते चार इसम धावून आले. त्यांनी तरुणीकडे विचारणा केली असता तिने सदर दोघे जण आपल्याला पळवून नेत असल्याचे सांगितले. यानंतर त्या इसमांनी तरुणीची सुटका करत आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर संगमनेश शहर पोलिसांनी तरुणीचा जबाब नोंदवत पुढील कारवाई सुरु केली.