शारीरिक संबंधानंतर तरुणाकडून ब्लॉक, चिडलेल्या युवतीचं टोकाचं पाऊल

| Updated on: Dec 23, 2021 | 12:59 PM

सोशल मीडियावर ब्लॉक केल्यामुळे तरुणीचा तीळपापड झाला. त्यामुळे तिने तरुणावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला. त्याचप्रमाणे तिने बनावट फेसबुक अकाऊण्ट उघडून तरुणासोबतच त्याच्या कुटुंबीयांनाही जीवे मारण्याची धमकी दिली.

शारीरिक संबंधानंतर तरुणाकडून ब्लॉक, चिडलेल्या युवतीचं टोकाचं पाऊल
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

कॅनबेरा : तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर तरुणाने तिला सोशल मीडियावर ब्लॉक केलं. यामुळे चिडलेल्या तरुणीने त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. त्यासोबतच बलात्कार आणि लुटीसारखे गंभीर आरोपही केले. मात्र तरुणीचे आरोप निराधार असल्याचं कोर्टात सिद्ध झालं. अखेर, तरुणाला जीवे ठार मारण्यासाठी धमकावल्याबद्दल महिलाच दोषी ठरली. ऑस्ट्रेलियामध्ये ही विचित्र घटना उघडकीस आली आहे.

काय आहे प्रकरण?

‘डेली मेल’मधील वृत्तानुसार ऑस्ट्रेलियातील अॅडलेडमध्ये राहणारी संबंधित तरुणी मित्राला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोषी आढळली आहे. तिने त्याच्यावर बलात्काराचा सनसनाटी आरोपही केला होता.

तरुणीचे गंभीर आरोप

अॅडलेड जिल्हा कोर्टात सुनावणीदरम्यान तरुणाच्या वकिलांनी सांगितले, की 2017 मध्ये दोघा जणांमध्ये संमतीने शारीरिक संबंध आले. त्यानंतर तरुणाने तिला सोशल मीडियावर ब्लॉक केलं. त्यामुळे नाराज झालेल्या तरुणीने त्याला धमकवायला सुरुवात केली. हद्द म्हणजे तिने तरुणावर बलात्कार आणि डेबिट कार्ड चोरुन पैसे लुटल्याचा आरोपही केला.

तरुणाने त्या दिवशी मद्यपान केले होते. त्याने मलाही गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्या अवस्थेत मी कशी सहमती देऊ शकते, असा प्रतिप्रश्न तरुणीने कोर्टात केला. सोशल मीडियावर आपण कोणालाही त्रास दिला नसल्याचे पुरावे तरुणीने कोर्टात दिले. त्याचप्रमाणे ब्लॉक केल्याच्या रागातून आरोप केल्याचाही तिने इन्कार केला.

तरुणाला अर्वाच्च मेसेज

सोशल मीडियावर ब्लॉक केल्यामुळे तरुणीचा तीळपापड झाला. त्यामुळे तिने तरुणावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला. त्याचप्रमाणे तिने बनावट फेसबुक अकाऊण्ट उघडून तरुणासोबतच त्याच्या कुटुंबीयांनाही यातना आणि जीवे मारण्याची धमकी दिली. डोकं कापल्याचे आणि शरीराचे तुकडे केल्याचे फोटो पाठवण्यासोबतच तिने नरभक्षणाचे मेसेज पाठवल्याचा दावाही तरुणातर्फे वकिलांनी केला.

धमकावल्याबद्दल तरुणी दोषी

तरुणाला जीवे ठार मारण्यासाठी धमकावल्याबद्दल महिलाच दोषी ठरली आहे. सध्या ती जामिनावर बाहेर असून जानेवारी महिन्यात तिला शिक्षेची सुनावणी केली जाणार आहे.


संबंधित बातम्या :

रेणुका शिंदे-सीमा गावितला फाशीच हवी, राज्य सरकार ठाम, आजन्म कारावासाविषयीचं वक्तव्य मागे

पुण्यात दोघांचा एकाच झाडाला गळफास, तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर

बायकोला मतदान करतानाचा फोटो WhatsApp स्टेटसवर, बुलडाण्यातील अतिउत्साही नवऱ्यावर गुन्हा