Bangalore Murder | लैंगिक अत्याचाराचा आरोप, अल्पवयीन मित्रांच्या मदतीने मुलीने बापाला संपवलं

बंगळुरुत (Bangalore) हत्येची (Murder) एक अत्यंत धक्कादायक घटना पुढे आली आहे. येथे एका किशोरवयीन मुलीने तीन अल्पवयीन मित्रांसोबत मिळून आपल्याच पित्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बंगळुरु पोलिसांनी आरोपी मुलगी आणि तिच्या तीन अल्पवयीन मित्रांना अटक केली आहे.

Bangalore Murder | लैंगिक अत्याचाराचा आरोप, अल्पवयीन मित्रांच्या मदतीने मुलीने बापाला संपवलं
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 24, 2021 | 7:58 AM

बंगळुरु : बंगळुरुत (Bangalore) हत्येची (Murder) एक अत्यंत धक्कादायक घटना पुढे आली आहे. येथे एका किशोरवयीन मुलीने तीन अल्पवयीन मित्रांसोबत मिळून आपल्याच पित्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बंगळुरु पोलिसांनी आरोपी मुलगी आणि तिच्या तीन अल्पवयीन मित्रांना अटक केली आहे.

पित्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप

ही घटना बंगळुरुच्या येलहंका न्यू टाउन पोलीस हद्दीत घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीने आपल्या पित्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. यानंतर तिने तिच्या मित्रांसोबत मिळून पित्याची हत्या केली.

किशोरवयीनने पिता दीपक (वय 45) यांची सोमवारी सकाळी चाकूने वार करत हत्या केली. दीपक यांच्या दोन मुलींपुढेच आरोपींनी त्यांची हत्या केली. मृत दीपक हे बिहारचे राहणारे असून तो बंगळुरुत जीकेवीके परिसर परिसरात सुरक्षा गार्ड म्हणून काम करायचे. ते त्यांच्या पत्नी आणि दोन मुलींसोबत राहायचे.

दीपक यांची एक मुलगी जवळच्याच कॉलेजमध्ये शिकत होती. तर, दुसरी मुलगी चौथ्या वर्गात शिकते. दीपक यांच्या दोन पत्नी होत्या. त्यापैकी पहिली बिहारमध्ये राहात होती तर दुसरी कर्नाटकात राहात होती. तिला दोन मुली होत्या. दीपकने आपल्या मुलीचं लैंगिक शोषण केलं आणि जेव्हा त्याच्या पत्नीला याबाबत माहित झालं तेव्हा त्याच्यात वाद झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दीपक नशेत होता आणि त्याने आपल्या मुलीवर पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पण, यावेळी मुलीने तिच्या मित्राला फोन केला, ज्यांना याबाबत आधीच तिने सांगितलेलं होते. त्यानंतर मित्र त्याच्या काही मित्रांना सोबत घेऊन आला आणि त्याने दीपक यांच्यावर हल्ला चढवला, ज्यात त्याचा मृत्यू झाला.

बंगळुरु पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मुलगी आणि तिच्या तीन अल्पवयीन मित्रांना अटक केली आहे. या घटनेमागे आणखी काही कारण आहे का याचा तपास सध्या पोलीस करत आहे.

संबंधित बातम्या :

चारित्र्यावर सतत संशय घेत असल्याने सूनेकडून सासऱ्याची कु्ऱ्हाडीने वार करुन हत्या

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत अपहरण केल्याप्रकरणी आरोपीला चार वर्षाचा कारावास