चारित्र्यावर सतत संशय घेत असल्याने सूनेकडून सासऱ्याची कु्ऱ्हाडीने वार करुन हत्या

ज्योती अतुल हजारे ही महिला आपल्या कुटुंबासोबत जामखेड रोडवरील चिचोंडी पाटील गावात वास्तव्यास आहे. ज्योतीचे सासरे अर्जुन हजारे हे नेहमी तिच्यावर संशय घेत असत. यामुळे सासरा आणि सूनेमध्ये नेहमी भांडणे होत असत.

चारित्र्यावर सतत संशय घेत असल्याने सूनेकडून सासऱ्याची कु्ऱ्हाडीने वार करुन हत्या
मालमत्तेच्या वादातून बंगालमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या


अहमदनगर : सासऱ्याच्या छळाला कंटाळून महिलेने त्याची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमधील जामखेड रोडवरील चिंचोडी पाटील गावात मंगळवारी घडली आहे. अर्जुन गोविंद हजारे(63) असे मयत सासऱ्याचे तर ज्योती अतुल हजारे असे आरोपी सुनेचे नाव आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी सूनेला अटक केली आहे.

सासरा नेहमी सूनेच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा

ज्योती अतुल हजारे ही महिला आपल्या कुटुंबासोबत जामखेड रोडवरील चिचोंडी पाटील गावात वास्तव्यास आहे. ज्योतीचे सासरे अर्जुन हजारे हे नेहमी तिच्यावर संशय घेत असत. यामुळे सासरा आणि सूनेमध्ये नेहमी भांडणे होत असत. नेहमीप्रमाणे ज्योती आणि अर्जुन यांचे मंगळवारी सकाळी भांडण झाले. गावातील रस्त्यातच सासऱ्याने सुनेशी भांडण सुरु केले. रस्त्यात सुरु झालेल्या वादामुळे संतापलेल्या सुनेने रागात भरात सासऱ्यावर कुऱ्हाडीने वार केले. तसेच दगडानेही ठेचून काढले. या मारहाणीत अर्जुन यांच्या तोंडावर, डोक्यात, कपाळावर गंभीर जखमा झाल्या. यामुळे गंभीर जखमी झालेल्या अर्जुन हजारे यांचा जागीच मृत्यू झाला.

सूनेला पोलिसांकडून अटक

घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. तसेच सासऱ्याची हत्या केल्याप्रकरणी सून ज्योती हजारे हिला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी बाबासाहेब बनकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादीत घटनाक्रम आणि कारण नमूद केलं आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Murder of father-in-law by daughter in law due to constant suspicion on character)

इतर बातम्या

अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून आपलं निलंबन रद्द करण्यासाठी अर्ज केला, सचिन वाझेची जबाबात माहिती

Ambernath | राष्ट्रवादी शहराध्यक्षावर भावाचा हल्ला, मोबाईलच्या टॉवरवरुन वाद

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI