आई-मुलीचं मॅनेजरशी लफडं, लोन काढायला आलेल्यांना बनवलं मर्डरर, बँकेतल्या अफेअरची खतरनाक गोष्ट
ऐश्वर्याची आई सुजाता सुद्धा त्याच बँकेत काम करायची. आधी तिरुमल राव आणि सुजाताच अफेअर होतं. तिरुमल रावने ऐश्वर्यासाठी पहिल्या पत्नीला सुद्धा मारण्याच प्लानिंग केलेलं. जमिनीचा सर्वे करण्याच्या नावाखाली तेजेश्वरला सोबत घेऊन गेले होते. तो ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसलेला.

इंदूरचा व्यावसायिक राजा रघुवंशी प्रमाणे आता तेलंगणमध्ये एका नव्या नवरीने पतीची हत्या केल्याच प्रकरण समोर आलं आहे. तिने सुद्धा प्रियकराच्या साथीने ही हत्या केली. पण या हत्या प्रकरणात बऱ्याच गोष्टी चक्रावून टाकणाऱ्या आहेत. या प्रियकराच आधी नवरीच्या आईसोबत अफेअर होतं. नंतर नवरीसोबत अफेअर सुरु झालं. मुलीच लग्न झाल्यानंतर दोघांनी मिळून हे खतरनाक हत्याकांड प्रत्यक्षात आणलं. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 23 वर्षांची ऐश्वर्या कुरनूलची राहणारी आहे. 26 वर्षांचा तेजेश्वर गद्वाल येथे रहायचा. दोघांच 18 मे रोजी लग्न झालं. लग्नाच्या बरोबर एक महिन्याने तेजेश्वरचा मृतदेह नाल्यात सापडला. कुटुंबाने ऐश्वर्या आणि तिच्या कुटुंबावर हत्येचा आरोप केला. पोलिसांनी ऐश्वर्या आणि तिची आई सुजाता यांना ताब्यात घेतलं होतं.
पोलीस चौकशीत समोर आलं की, लग्नाच्या एक महिन्यानंतर ऐश्वर्याने बँक मॅनेजर तिरुमल रावसोबत मिळून तेजेश्वरच्या हत्येच प्लानिंग केलेलं. तिरुमल राव आधीपासून विवाहित आहे. ऐश्वर्याची आई सुजाता सुद्धा त्याच बँकेत काम करायची. आधी तिरुमल राव आणि सुजाताच अफेअर होतं. तिरुमल रावने बँकेत लोन काढण्यासाठी आलेल्या तिघांना तेजेश्वरच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यांना 2 लाख रुपये दिलेले.
पळून जाण्यासाठी किती लाखाच लोन काढलेले?
पोलिसांनुसार आंध्र प्रदेश आणि तेलंगण पोलीस मिळून तपास करत आहेत. तेजेश्वरचा मृतदेह मिळणार नाही, असं रावने प्लानिंग केलेलं. त्याने पळण्याची व्यवस्था केलेली. त्याने बँकेतून 20 लाख रुपयाच लोन घेतलेलं. ऐश्वर्यासोबत लडाखला पळून जाण्याच्या तयारीत होता. तिरुमल रावने ऐश्वर्यासाठी पहिल्या पत्नीला सुद्धा मारण्याच प्लानिंग केलेलं.
फोनवर तेजेश्वरचा मृतदेह दाखवला
एका रिपोर्ट्नुसार रावच ऐश्वर्याची आई सुजासासोबत सुद्धा संबंध होता. सुजाता बँकेत सफाई कर्मचारी होती. तिच्या अनुपस्थितीत ऐश्वर्याला कामावर जायला लागली. त्यावेळी रावची तिच्यासोबत जवळीक वाढली. एसपीने सांगितलं की, मारेकरी जमिनीचा सर्वे करण्याच्या नावाखाली तेजेश्वरला सोबत घेऊन गेले होते. तो ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसलेला. त्यावेळी मारेकऱ्यांनी त्याचा गळा आवळला. त्याच्या पोटात चाकू मारला. मारेकऱ्यांनी रावला फोनवर तेजेश्वरचा मृतदेह दाखवला. नंतर नाल्यात फेकून दिला.
पोलिसांना मृतदेह कसा मिळाला?
जिथे सर्वेसाठी चाललेले कुरनूलमध्ये त्याच जमिनीत तेजेश्वरला दफन करायचा प्लान होता. पण तिथे काही लोक असल्याने नाल्यात मृतदेह फेकून दिला. नाल्यात पाणी कमी होतं. तेजेश्वच लोकेशन शोधण्यासाठी फोनवरुन सिग्नल ट्रॅक केला. त्यावेळी आम्हाला नाल्यात त्याचा मृतदेह मिळाला. मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. हातावरच्या टॅटूवरुन मृतदेहाची ओळख पटवण्यात आली.
