AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलं चोरी करणारी टोळी…ब्लँकेट विकणाऱ्यांनाच दिला बेदम चोप…

नाशिकच्या घटनेत दोघेही ब्लँकेट विक्रेते असल्याचे तपासांती लक्षात आले. परिसरातील नागरिकांनी मारहाण करणाऱ्यांना वेळीच रोखल्याने अनर्थ टळला आहे.

मुलं चोरी करणारी टोळी...ब्लँकेट विकणाऱ्यांनाच दिला बेदम चोप...
Image Credit source: TV9 Network
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Sep 14, 2022 | 11:20 AM
Share

नाशिक : शहरात मुलं पळवणारी टोळी (Child abductors)  आली म्हणत ब्लँकेट विकणाऱ्यांना दोघांना नागरिकांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या टाकळीरोड परिसरात ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेनं परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी उपनगर पोलीसांना (NashikPolice) कळवताच पोलीसांचे पथक दाखल झाले होते. पोलीसांनी त्यांची चौकशी करत कागदपत्रे (Documents) तपासली. मुलं पळवणारी किंवा चोरणारी ही टोळी नसल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी दोघा ब्लँकेट विक्रेत्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जात गुन्हा (Crime) दाखल न करता सोडून दिले.

यापूर्वी देखील अशा गैरसमजूतीतून मारहाणीच्या घटना समोर आल्या आहे. मुलं पळवणारी किंवा चोरणारी टोळी आली म्हणत नागरिक बेदम मारहाण करतात.

पालघरमध्येही मागे मुलं पळवणारी टोळी आली म्हणून साधू-महंतांची हत्या झाली होती. त्यावरून राजकीय रान देखील पेटले होते.

आताही सांगली येथे मुले चोरणारी टोळी समजून साधूंना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. जत तालुक्यातील लवंगा येथे ही घटना घडली आहे.

मुलं चोरी करणारी टोळी म्हणून यापूर्वी धुळे-जळगाव या परिसरात देखील नागरिकांनी मारहाण केल्याच्या घटना समोर आल्या होत्या.

नाशिकच्या घटनेत दोघेही ब्लँकेट विक्रेते असल्याचे तपासांती लक्षात आले. परिसरातील नागरिकांनी मारहाण करणाऱ्यांना वेळीच रोखल्याने अनर्थ टळला आहे.

टाकळी परिसरात ब्लँकेट विकत असताना परिसरातील कर मोगल साळवे यांचा लहान मुलगा याने ब्लँकेट ओढल्याने ब्लँकेट विकणार्याला त्याचा राग आला होता.

त्याने लहान मुलाचा गळा धरला ही बाब परिसरातील नागरिकांनी बघितली अशी माहिती नागरिक सांगताय. त्यांवेळी मुलं पळवणारी टोळी तर नाही म्हणून मारहाणीचा प्रकार समोर आला.

Follow Us
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले