AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या हॉटेलमध्ये जेवले, त्याच हॉटेलमालकाच्या जीवावर उठले, कारण काय तर…

माजलगाव शहरा पासुन ४ किमी अंतरावर नागडगाव पाटी कॉनर्र वर गावरान ढाबा आहे. महादेव गायकवाड हे त्याच ढाब्याचे मालक. काल संध्याकाळी 7.30 च्या सुमारास माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील ग्राहक ढाब्यावर जेवायला आले होते. पण...

ज्या हॉटेलमध्ये जेवले, त्याच हॉटेलमालकाच्या जीवावर उठले, कारण काय तर...
ग्राहकानेच घेतला हॉटेलमालकाचा जीवImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 21, 2025 | 11:33 AM
Share

बीडच्या मस्साजोगमधील सरपंचांची झालेली निर्घृण हत्या, गेल्या 4 महिन्यांपासून गाजत्ये. संतोष देशमुखांचा गेलेला बळी यावरून सध्या राज्यातील वातावरण प्रचंड तापलेलं आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी बीडच्या माजलगावमध्ये भाजप पदाधिकारी बाबासाहेब आगे यांचीही कोयत्याने सपासप वार करून हत्या झाली. त्याची दहशत अद्याप कायम असतानाच आता बीडच्या माजलगावमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार रंगला आहे. ज्या हॉटेलमध्ये बसले, पोटभरून जेवले, त्याच हॉटेलचे बील देण्यावरून झालेल्या वादात हॉटेलमालक आणि त्याच्या मुलावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या धक्कादायक प्रकारानंतर दोघावंरही रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र दुर्दैवाने यामध्ये जखमी बापलेकांपैकी, वडिलांचा मृत्यू झाला. रुग्णालयातच महेश गायकवाड यांनी अखेरचा श्वास घेतला असून या प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

गायकवाड यांच्या कुटुंबावर तर दु:खाचा अक्षरश: डोंगर कोसळला आहे. घरातील कर्त्या पुरूषाचा मृत्यू झला आहे, तर त्याच कुटुंबातूल दुसरा मुलगा हॉस्पिटलमध्ये जीवन-मृत्यूशी लढा देतोय, त्यामुळे गायकवाड कुटुंब प्रचंड हादरलं आहे. माजलगावमध्ये आठवड्याभराच्या आतच लागोपाठी घडलेल्या या दोन घटनांमुळे आता बीडमध्ये आता कायदा-सुव्यवस्था नावाचा काही प्रकार उरला आहे की नाही असा प्रश्न संतप्त नागरिकांकडून विचारला जात आहे. आरोपींना तत्काल अटक करावी अशी मागणी गायकवाड यांच्या कुटुंबियांनी केली आहे.

ज्या हॉटेलमध्ये जेवले, त्याच हॉटेलमालकाचा घेतला जीव

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या माजलगाव मध्ये ढाबा मालक व त्याच्या मुलावर प्राण घातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार रात्री उघडकीस आला होता. यामध्ये महादेव गायकवाड आणि त्यांचा मुलगा आशुतोष हे दोघे गंभीररित्या जखमी झाले होते. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र महादेव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जीव वाचू शकला नाही. रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला तर त्यांचा मुलगा अजूनही मृत्यूशी लढा देतोय.

माजलगाव शहरा पासुन ४ किमी अंतरावर नागडगाव पाटी कॉनर्र वर गावरान ढाबा आहे. महादेव गायकवाड हे त्याच ढाब्याचे मालक. काल संध्याकाळी 7.30 च्या सुमारास माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील ग्राहक ढाब्यावर जेवायला आले होते. जेवणा झाल्यावर देण्यात आलेल्या बिलावरून काहीतरी वाजलं आणि ग्राहक प्रचंड संतापले. त्याच रागाच्या भरात ग्राहकांनी मागचा-पुढचा काहीच विचार केला नाही आणि महादेव गायकवाड यांच्यावर तसेच त्यांचा मुलगा आशुतोषवरही जोरदार हल्ला चढवला.त्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. आरोपी रोहित शिवाजीराव थावरेने आपल्या साथीदारांच्या मदतीने दोघांवर हल्ला केल्याची माहिती समोर आली.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेले, गंभीर जखमी झालेले महादेव आणि आशुतोष गायकवाड दोघांनाही ताताडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. महादेव गायकवाड यांना संभाजीनगर येथे उपचाराठी हलवण्यात होते. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने महादेव यांची प्राणज्योत मालवली. तर आशुतोषची प्रकृती अजूनही चिंताजनक असून तो जीवन-मरणाच्या उंबरठ्यावर आहे.

याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.