सहकारी महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवणं महागात, रंगेल प्राध्यापकाला पाच वर्षांचा कारावास

| Updated on: Mar 05, 2021 | 12:17 PM

बीडमधल्या रंगेल प्राध्यापकाला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा विशेष आतिरिक्त न्यायालयाने सुनावली आहे. (Beed Professor Vulgar Video colleague )

सहकारी महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवणं महागात, रंगेल प्राध्यापकाला पाच वर्षांचा कारावास
Follow us on

बीड : सहकारी प्राध्यापिकेला अश्लील चित्रफितीची लिंक पाठवणं प्राध्यापकाला चांगलंच महागात पडलं आहे. आरोपी प्राध्यापकाला पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात नोव्हेंबर 2017 मध्ये हा प्रकार घडला होता. (Beed Professor receives Five Years Jail for sending Vulgar Video link to colleague on WhatsApp)

बीडमधल्या रंगेल प्राध्यापकाला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा विशेष आतिरिक्त न्यायालयाने सुनावली आहे. सहकारी प्राध्यापिकेला अश्लील चित्रफितीची लिंक पाठवून विनयभंग केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी प्राध्यापकाला विशेष अतिरिक्त सत्र न्यायाधीश डीएम खडसे यांनी पाच वर्ष सश्रम कारावास आणि आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

व्हॉट्सअॅपवरुन अश्लील व्हिडिओ लिंक

शिक्षा सुनावलेल्या प्राध्यापकाचे नाव गजानन नरहरी करपे असून तो 41 वर्षांचा आहे. बीडमधील स्वराज नगर भागात तो राहतो. आरोपी गजानन करपे शहरातील एका शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात नोकरीला होता. याच महाविद्यालयातील प्राध्यापिकेला त्याने व्हॉट्सअॅपवरुन अश्लील व्हिडिओ असलेली लिंक पाठवली होती.

पीडिता विशाखा समितीच्या अध्यक्षपदी

पीडित प्राध्यापिका ही स्वतः विशाखा समितीच्या अध्यक्षपदी होती. तिने हा प्रकार महाविद्यालय प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. नोव्हेंबर 2017 मध्ये घडलेल्या या प्रकारावरुन महाविद्यालय प्रशासनाने करपे याला निलंबित केलं होतं.

वहिनीला ‘मधलं बोट’ दाखवणं महागात

वहिनीला ‘मधलं बोट’ दाखवणं दीराला चांगलंच महागात पडलं होतं. अश्लील हावभाव करत ‘मधलं बोट’ दाखवल्याच्या आरोपातून दिल्लीतील कोर्टाने दीड वर्षांपूर्वी एका आरोपीला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तरुणाने अश्लील हावभाव करुन ‘मधलं बोट’ दाखवल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं होतं.

तीन वर्षांच्या तुरुंगवासासोबतच तरुणाला कोर्टाने दंडही सुनावला होता. महानगर दंडाधिकारी वसुंधरा आझाद यांनी निकाल सुनावला होता.पाश्चिमात्य पद्धतीनुसार ‘मधलं बोट’ अर्थात ‘मिडल फिंगर’ दाखवणं हे असंस्कृतपणाचं लक्षण मानलं जातं.

संबंधित बातम्या :

वहिनीला ‘मधलं बोट’ दाखवलं, दीराला तीन वर्षांचा कारावास

भररस्त्यात तरुणीला ‘आयटम’ म्हणणाऱ्या मुंबईकर तरुणाला बेड्या

(Beed Professor receives Five Years Jail for sending Vulgar Video link to colleague on WhatsApp)