AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भररस्त्यात तरुणीला ‘आयटम’ म्हणणाऱ्या मुंबईकर तरुणाला बेड्या

तक्रारदार महिलेला भररस्त्यात 'आयटम' अशी हाक मारुन पळून जाण्याचा प्रयत्न आरोपीने केला. मात्र महिलेने त्याचा पाठलाग करुन त्याची धरपकड केली.

भररस्त्यात तरुणीला 'आयटम' म्हणणाऱ्या मुंबईकर तरुणाला बेड्या
| Updated on: Sep 24, 2019 | 12:43 PM
Share

मुंबई : मुंबई विमानतळावर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला ‘आयटम’ असं संबोधणाऱ्या तरुणाला (Man calls airport staffer item) बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तक्रारदार महिलेने विलेपार्ले परिसरात 26 वर्षीय आरोपीचा पाठलाग करुन त्याची धरपकड केली होती.

मुंबई विमानतळावर काम करणारी तक्रारदार महिला कर्मचारी शुक्रवारी संध्याकाली काम आटोपून घराच्या दिशेने निघाली होती. राजेंद्र प्रसाद नगर भागातील बस स्टॉपवर महिलेला तिच्या सहकाऱ्याने ड्रॉप केलं.

त्यावेळी 26 वर्षांच्या दिनेश यादवने तिला पाहून ‘आयटम’ (Man calls airport staffer item) अशी हाक मारली. त्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा महिलेने थरारक पाठलाग केला. दिनेशला पकडून तिने पोलिसांच्या ताब्यात दिलं.

घटना घडली त्यावेळी आरोपी मद्याच्या अंमलाखाली असल्याचा दावा केला जात आहे.

पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 354 अ (लैंगिक छळ), 509 (महिलेचा विनयभंग करण्याचा उद्देश) अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सध्या त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

वहिनीला ‘मधलं बोट’ दाखवलं, दीराला तीन वर्षांचा कारावास

काही दिवसांपूर्वीच वहिनीला अश्लील हावभाव करत ‘मधलं बोट’ दाखवल्याच्या आरोपातून दिल्लीतील कोर्टाने आरोपी दीराला तीन वर्षांचा कारावास सुनावला होता. तक्रारदार महिलेचे आरोप खोडून काढणारे पुरावे नसल्याचं सांगत कोर्टाने पीडितेची साक्ष विश्वासार्ह मानून त्याआधारे निकाल देण्याची तयारी दाखवली होती.

संबंधित बातम्या :

किस न दिल्याने प्रियकराकडून प्रेयसीची हत्या

विवाहित शेजारणीला फ्लाईंग किस देणं महागात, आरोपीला तीन वर्षांचा कारावास

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...