किस न दिल्याने प्रियकराकडून प्रेयसीची हत्या

प्रेयसीने (Girlfriend) किस (Kiss) न दिल्याने प्रियकराने (Boyfriend) तिची हत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील जबलपूर येथे घडला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

किस न दिल्याने प्रियकराकडून प्रेयसीची हत्या

भोपाळ (मध्य प्रदेश) : प्रेयसीने (Girlfriend) किस (Kiss) न दिल्याने प्रियकराने (Boyfriend) तिची हत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील जबलपूर येथे घडला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून सध्या अधिक तपास केला जात आहे. पिंकी धुर्वे (18) असं मृत मुलीचे नाव आहे, तर रमन सिंह (19) असं आरोपी प्रियकराचं नाव आहे,अशी माहिती विविध वृत्तपत्रांनी दिली आहे.

मृत तरुणी पिंकी आणि आरोपी प्रियकर रमन दोघे बारावीच्या वर्गात शिकत होते. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते असं सांगितलं जात आहे. 3 सप्टेंबर रोजी हे दोघेजण बिजापूरच्या जंगलात गेले होते. या दरम्यान रमनने पिंकीकडे किस देण्याची मागणी केली. पण पिंकीने किस देण्यास मनाई केली. यावर दोघांमध्ये वाद झाले. यानंतर रमनने पिंकीला धक्का दिला, ज्यामुळे ती जमीनीवर पडली आणि तिच्या डोक्याला मार लागला. यानंतर काही वेळाने तिचा मृत्यू झाला.

पिंकीचा मृत्यू झाल्याने घाबरलेल्या रमनने मृतदेह झाडांच्या पाला पाचोळ्यात लपवला आणि तेथून पळ काढला. यानंतर कुंडम पोलिसांना 5 सप्टेंबर रोजी बिजापूर येथील जंगलात एका तरुणीचा मृतदेह सापडला असल्याची माहिती मिळाली. यानंतर तातडीने पोलीस अधिक्षक अमित सिंह आणि त्यांचे पथक घटनास्थळी पोहचले. पोलिसांच्या चौकशीत तरुणीची हत्या झाल्याचे समोर आलं. यानंतर अधिक चौकशी केली असता मृत तरुणी कुटरा घोंदी गावात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

दरम्यान, पोलिसांनी पिंकीचा फोन चेक केला असता रमन आणि पिंकी बऱ्याचदा फोनवर बोलायचे. तसेच त्यांच्या महाविद्यालयातही अनेकांना या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे माहित होते. पोलिसांनी तातडीने रमनला अटक करत सर्व घटनेची चौकशी केली. यानंतर या गुन्ह्याचा खुलासा झाला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *