नर्तकीच्या सौंदर्याने वेडापिसा झाला… माजी उपसरपंचाने गाठले 21 वर्षीय तरुणीचे घर, डोक्याला पिस्तुल लावली आणि…

नुकताच एका धक्कादायक घटनेने बीड हादरले आहे. एका उपसरपंचाने थेट स्वत: वर गोळी झाडून आयुष्य संपवले. हेच नाही तर आता गंभीर आरोप करण्यात आले. पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत. धक्कादायक माहिती ही पुढे येताना दिसतंय.

नर्तकीच्या सौंदर्याने वेडापिसा झाला... माजी उपसरपंचाने गाठले 21 वर्षीय तरुणीचे घर, डोक्याला पिस्तुल लावली आणि...
Beed
| Updated on: Sep 10, 2025 | 11:17 AM

माणूस एकदा प्रेमात पडल्यावर काय करेल याचा भरोसा नाही. असाच एक धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आलाय. बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसाला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (वय 34) हे कला केंद्रातील नर्तिके प्रेमात पडले. त्यांनी महागडा मोबाईल, सोन्याचे दागिने तिला दिले. मात्र, अचानक नर्तिका पूजा गायकवाड हिने त्यांच्याशी बोलणे बंद केले आणि दोघांमधील वाद टोकाला पोहोचल. त्यानंतर थेट त्यांनी बार्शी तालुक्यातील सासुर हे पूजाचे गाव गाठले आणि तिच्या घरी जात भेट घेतली. पूजा मागील काही दिवसांपासून बोलत नसल्याने गोविंद बर्गे हे त्रस्त होते. पूजामध्ये आणि त्यांच्यामध्ये भेट झाली, पण त्यांचे समाधान झाले नाही आणि थेट त्यांनी पूजाच्या घरासमोर लावलेल्या आपल्या गाडीत बसून स्वत:वर गोळी झाडली.

गोविंद बर्गे यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता. मोठा पैसा ते कमवत. हेच नाही तर गेवराईमध्ये त्यांचा मोठा बंगला होता, शेतीही त्यांच्याकडे चांगली होती. राजकारणातही सक्रिय होते. मात्र, गोविंद यांना कला केंद्रात जाण्याचा नाद होता. मागील काही वर्षांपासून गोविंद हे थापडीतांडा येथील कला केंद्रात सतत जात. तिथे त्यांची ओळख पूजा गायकवाड हिच्यासोबत झाली. हळूहळू गोविंद हे पूजाच्या प्रेमात पडले. तिला महागड्या भेट वस्तू देण्यास त्यांनी सुरूवात केली.

पूजाला भेटण्यापूर्वीच गोविंद यांचे लग्न झाले होते आणि त्यांनी एक मुलगा आणि मुलगी होती. यादरम्यान पूजाने अचानक गोविंद यांच्याशी बोलणे बंद केले. पूजाने बोलावे याकरिता गोविंदा यांनी अनेक प्रयत्न केली. मात्र, पूजा बोलत नव्हती. असे सांगितेल जाते की, गोविंद यांच्या गेवराईच्या बंगल्यावरून दोघांमध्ये वाद होता. पूजा तो बंगला स्वत:च्या नावावर कर म्हणून गोविंदच्या मागे लागली होती. असेही सांगितले जाते की, यावरून पूजा गोविंदला सारखी धमकावत.

शेवटी पूजाचे घर गोविंदने गाठले तिला बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, पूजाच्या घरातून बाहेर येत गोविंद याने गाडी आतमधून लॉक करून गोळी झाडली. पोलिस या प्रकरणात अधिकचा तपास करत आहेत. खरोखरच ही आत्महत्या की, घातपात याचा शोध घेतला जातोय. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.