प्रेमाचं जाळ टाकलं, अन् हॉटेलमध्ये नेऊन…संशयाच्या भूतामुळे निर्घृण खून; प्रियकराचा कांड वाचून उडेल थरकाप!

दिल्लीतील पहाडगंज परिसरातील नबी करीम पोलीस स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये एका प्रियकराने संशयातून आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली आहे. पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.

प्रेमाचं जाळ टाकलं, अन् हॉटेलमध्ये नेऊन...संशयाच्या भूतामुळे निर्घृण खून; प्रियकराचा कांड वाचून उडेल थरकाप!
गेल्या अनेक दिवसांपासून बीड जिल्हा चर्चेत आहे. या जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर इतर काही खुनाची तसेच अमानुष मारहाणीची प्रकरणं समोर आली आहेत. असे असतानाच आता बीडमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
| Updated on: Jun 08, 2025 | 5:56 PM

देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. अशातच आता राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीतील पहाडगंज परिसरातील नबी करीम पोलीस स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली आहे. प्रियकराला आपल्या प्रेयसीचे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता, त्यामुळे त्याने प्रेयसीला संपवल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

प्रेयसीची हत्या करून आरोपी प्रियकर घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेची माहिती मिळतात पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.या प्रकरणाची चौकशी करताना मृत तरुणी एका तरुणासह हॉटेलमध्ये आल्याचे समजले, या तरुणाचा मागोवा घेत पोलिसांनी आरोपी प्रियकराला दोन तासांत अटक केली आहे.

प्रेयसीच्या चारित्र्यावर होता संशय

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील पहाडगंज परिसरात ही घटना घडली आहे. मृत तरुणीचे नाव सारिका असे आहे, ती ईशान्य दिल्लीतील बुरारी भागातील रहिवासी होती. सारिका तिचा प्रियकर सचिनसोबत नबी करीम पोलीस स्टेशन परिसरातील रोहित डीएक्स हॉटेलमध्ये आली होती. हे दोघेही रूम नंबर १२३ मध्ये राहत होते. मात्र सचिनला प्रेयसी सारिकाचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध आहेत असा संशय होता.

गळा दाबून हत्या 

सारिकावर संशय घेतल्याने दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि नंतर सचिनने सारिकाला बेदम मारहाण केली आणि तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर आरोपी सकाळी ताबडतोब हॉटेलमधून बाहेर पडला आणि पळून गेला. काही वेळानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी रूम नंबर १२३ मध्ये जाऊन पाहिले तेव्हा सारिकाचा मृतदेह बाथरूममध्ये पडलेला होता. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीला २ तासांत अटक

घटना घडल्यानंतर पोलीसांनी आरोपी सचिनला २ तासांत अटक केली. अटनेनंतर सचिनने हत्येची कबुली दिली आहे. तसेच सारिकाचे दुसऱ्या पुरुषाशी अवैध संबंध असल्याचा संशय होता, म्हणून सारिकाची हत्या केली असंही सचिनने कबूल केले असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.