AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime News : प्रेम प्रकरणातून भांडण, तरुणीच्या समोर रस्त्यात दोघांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, पोलिसांनी…

प्रेमप्रकरणातून झालेल्या भांडणात दोन तरुणांवर धारदार चाकूने हल्ला करण्यात आला. त्यामध्ये एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.

Crime News : प्रेम प्रकरणातून भांडण, तरुणीच्या समोर रस्त्यात दोघांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, पोलिसांनी...
bhandara jawaharnagar policeImage Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 04, 2023 | 9:15 AM
Share

भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यात एक प्रकरण असं घडलं की, लोकांना मोठा धक्का बसला आहे. प्रेम प्रकरणातून झालेल्या वादात दोन तरुणांवरती चाकू हल्ला करण्यात आला आहे. झालेल्या अचानक हल्ल्यामध्ये एका तरुणाचा जागीचं मृत्यू झाला आहे. या प्रकरणी भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर पोलिस स्टेशनमध्ये (bhandara jawaharnagar police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना झाल्याची माहिती समजल्यानंतर घटनास्थळी तिथल्या रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समजल्यानंतर तिथला जमाव संतप्त झाला होता. जखमी तरुणावरती तिथल्या सामान्य प्रशासन रुग्णालयात (General Administration Hospital) उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे ज्यावेळी त्या तरुणावरती हल्ला झाला, त्यावेळी तिथं दोन तरुणी सुध्दा होत्या अशी चर्चा आहे.

22 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसरा गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना भंडारा जिल्हाच्या जवाहरनगर पोलिस स्टेशन हद्दीत ठाणा न्याहारवाणी रस्त्यावर घडली आहे. आवेज हसन शेख (रा. ठाणा) असे मृताचे नाव असून, श्रेयस मुन्ना वाहाणे (18) असे गंभीर जखमीचे नाव आहे. घटनेनंतर पसार झालेल्या दोन्ही मारेकरी पोलिस स्टेशनमध्ये जमा झाल्याची माहिती मिळाली आहे. आरोपी तन्वीर पठाण (22) व अन्य एका साथीदाराचा समावेश आहे.

मृतक आवेज शेख (22) याला भंडारा येथील दोन्ही तरुणांनी फोन करून बोलावले. त्यावेळी आवेज व श्रेयस वाहने ठाणा निहारवाणी रस्त्यावर गेले होते. भंडारा येथून आलेल्या दोन्ही तरुणांनी वादातून आवेज व श्रेयसवर चाकूने वार केले. यात आवेजच्या मानेला, पोटाला व हाताला चाकूने हल्ला केला. झालेल्या जबरी हल्ल्यामध्ये आवेजच्या मृत्यू झाला. तर श्रेयस हा गंभीर जखमी झाला. यावेळी तेथे दोन तरुणी सुद्धा उपस्थित असल्याची प्राथमिक माहिती आहे. पसार झालेल्या दोन्ही आरोपींनी भंडारा पोलिस स्टेशनमध्ये जमा झाले आहेत. यात तन्वीर पठाण (22) व अन्य एका साथीदाराचा समावेश आहे.

रक्तबंबाळ अवस्थेत श्रेयसने ठाणा येथील आपल्या मित्रांना घटनेची माहिती दिली. तीन ते चार मित्र घटनास्थळी पोहोचले, घटनास्थळी आवेज व श्रेयस रक्तबंबाळ अवस्थेत डांबरी रस्त्यावर पडलेले होते. दोघांनाही लगेच शहापूर आरोग्य उपकेंद्र येथे दुचाकीने आणले. मात्र, तोपर्यंत आवेजचा मृत्यू झाला. श्रेयसवर प्राथमिक उपचारानंतर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले, आता पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....